‘स्पेशल २६’ स्टाईल सोनाराला लुटणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:00+5:302021-08-29T04:15:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धनकवडी : प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘स्पेशल २६’ या चित्रपटाप्रमाणे एका टोळक्याने आयकर अधिकारी ...

Gajaad looting ‘Special 26’ style gold | ‘स्पेशल २६’ स्टाईल सोनाराला लुटणारे गजाआड

‘स्पेशल २६’ स्टाईल सोनाराला लुटणारे गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धनकवडी : प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांच्या बहुचर्चित ‘स्पेशल २६’ या चित्रपटाप्रमाणे एका टोळक्याने आयकर अधिकारी असल्याचा बहाणा करून एका सोनाराला लुटण्याचा प्रकार भारती विद्यापीठ परिसरात घडला. टोळक्याने २० लाखांची रोकड आणि ३०० ग्रॅम सोने लुटून नेले आहे.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यातील ८ जणांना अटक केली आहे. लुटीमधील काही मालही हस्तगत केला आहे.

याप्रकरणी एका सोनाराने फिर्याद दिली आहे. विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरात एका सोनाराचा सोन्याची नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. तो घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करत होता. दरम्यान त्याचा व्यवसाय वाढल्याने तो परिसरातच एक दुकान विकत घेण्याच्या विचारात होता. यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संबंधितांना होती. यावरून त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि सोनाराला लूटण्याची एक योजना आखली. अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित चित्रपट ‘स्पेशल २६’ प्रमाणे आठ जणांनी इन्कमटॅक्स ऑफिसर बनून त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्याच्या घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा करण्यात आला. घरातील २० लाखांची रोकड आणि ३०० ग्रॅम सोने सील करून सोबत घेण्यात आले. सराफाने पोलिसांकडे धाव घेऊ नये म्हणून त्याला अपहरण करून सोबत घेण्यात आले. त्यानंतर सराफाला स्वामी नारायण मंदिरापाशी गाडीतून सोडून देण्यात आले व सर्व ऐवज घेऊन पळून गेले.

घाबरलेल्या सराफाने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून गुन्हेगारांच्या मागावर धाडली आणि रात्री उशिरा यातील काही गुन्हेगार ताब्यात घेतले आहे.

Web Title: Gajaad looting ‘Special 26’ style gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.