शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात निनादणार गायकवाड बंधूंची सनई; साहित्यप्रेमींचे होणार सुरेल स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:32 IST

मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सनईच्या मंजूळ सुरांनी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा होणार आहे. गायकवाड बंधूंच्या सनई आणि जलतरंगच्या सुरांनी साहित्यप्रेमींचे सुरेल स्वागत होणार आहे

ठळक मुद्देसंमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी, १६ फेब्रुवारी रोजी रंगणार जुगलबंदीचा सोहळा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य आणि संगीताचा होणार मिलाफ

पुणे : मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सनईच्या मंजूळ सुरांनी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा होणार आहे. गायकवाड बंधूंच्या सनई आणि जलतरंगच्या सुरांनी साहित्यप्रेमींचे सुरेल स्वागत होणार आहे. गायकवाड बंधूंनी यासाठी कोणताही मोबदला न घेण्याचा निर्णय घेतला आहे.गायकवाड बंधूंची नववी पिढी सनई आणि जलतरंग वादनाची धुरा सक्षमपणे सांभाळत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीतात दुर्लभ मानल्या जाणाऱ्या जुगलबंदीचा सोहळा संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ४ या वेळात रंगणार आहे.उदघाटन सोहळ्यातील मैफिलीत दत्तात्रय गायकवाड हे जलतरंग वादन तर धाकटे बंधू मुकूंद गायकवाड हे सनईवादन करणार आहेत. या दोहोंना सुनील गायकवाड, श्रीरंग गायकवाड (तबला) आणि आलाप गायकवाड (संबळ) साथसंगत करणार आहेत. ‘बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांनी १९०४ साली गायकवाड यांचे आजोबा पंडित वसईकर आणि वडील जी. जी. गायकवाड यांना पुण्याहून बोलावून घेतले होते. त्यांना संस्थानात दरबार कलाकार म्हणून मानाचे स्थान प्राप्त झाले होते. आजोबा आणि वडिलांचा वारसा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे नेण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे. मैफिलीत उत्स्फूर्त सादरीकरण करण्याचा विचार आहे’, अशा भावना दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केल्या.गायकवाड बंधूंनी आजवर पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, चंद्रपूर येथील नागपूर संगीत महोत्सव, दिल्ली संगीत नाटक अकादमीतर्फे आयोजित अखिल भारतीय संगीत संमेलन, अहमदाबाद येथील पंडित ओमकारनाथ संगीत समारोह अशा विविध संगीत महोत्सवांमध्ये वादन मैफिली सादर केल्या आहेत. त्यांना उस्ताद बिस्मील्ला खाँ यांच्यासह वादनाची संधी देखील मिळाली होती. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य आणि संगीताचा मिलाफ होणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनPuneपुणे