शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गहुंजे - साळुंब्रे साकव पूल गेला पाण्याखाली; शेतकरी व कामगारांची गैरसोय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 11:51 IST

नागरिकांना घालावा लागतोय १० किमीचा वळसा...

गहूंजे (पुणे): पवन मावळात होत असलेल्या दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने मावळातील गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणारा साकव पुल पूर्णपणे पाण्यात गेला आहे. पुलावरून वाहत असलेल्या जोरदार पाण्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी पंचक्रोशीतील शेतकरी, दुधव्यावसायिक व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. शेतकरी व कामगारांना ९ -१० किलोमीटरचा वळसा घालून दुसऱ्या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. 

गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने साळुंब्रे गावातून देहूरोड, पिंपरी -चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी तसेच पिंपरी, भोसरी व चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, देहूरोड, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी भाजी मंडई येथे तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, रावेत व विकासनगर येथे दुध घेऊन येणारे दुध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना सुमारे नऊ -दहा किलोमीटरचा  वळसा घालून ये - जा करावी लागणार आहे. 

उंच पूलाअभावी दरवर्षी होतेय गैरसोय : 

दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार यांची मोठी गैरसोय होत असते. मात्र शासन उदासीन असल्याची तक्रार करण्यात येत आहे. पावसाळ्याचे तीन-चार महिने मोठ्या जिकीरीचे असून शेतीमाल व दुध व्यवसायात मोठे नुकसान होत असते. उंच व मोठा पु;ल बांधून  कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शेतकरी व कामगार वर्गातून होत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfloodपूर