शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीपर्यंत गडकरी पोहोचावेत : श्रीराम रानडे; राम गणेश गडकरींच्या नाटकांचे अभिवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:11 IST

नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देराम गणेश गडकरी यांच्या आठवणींना देण्यात आला उजाळादारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरींची नाटके सदाहरित : रानडे

पुणे : नाट्यवाचनाचामागचा खरा हेतू असा आहे, नवीन पिढीपर्यंत शंभर वर्षांपूर्वीची रंगभूमी काय होती? आजची रंगभूमी काय आहे? जगाची रंगभूमी काय आहे हे समजले पाहिजे. नवीन पिढीपर्यंत राम गणेश गडकरी पोहोचले पाहिजे, असे मत श्रीराम रानडे यांनी व्यक्त केले. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विजय गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' अशी नाटके लिहिणारे राम गणेश गडकरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे अभिवाचन विजय कुलकर्णी, श्रीराम रानडे यांनी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात केले.या वेळी रानडे म्हणाले, ‘‘साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते. गडकरी यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकरी यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकरींची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्यांच्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.’’

विनोदी लिखाण करणाऱ्या लेखकाची ही दवा आपल्याला आमंत्रण करणारी पाहिजे. विनोद ही गडकऱ्यांच्या लेखणीची शाई होती. गडकरी यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

- विजय कुलकर्णी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशी