शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचे दगड-विटांपेक्षा शब्दांचे स्मारक उभे करायला हवे : विनय हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 20:16 IST

गडकरींचे मराठीतील साहित्य अत्यंत मोलाचे

ठळक मुद्दे 'साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी' पुस्तक प्रकाशन

पुणे: राम गणेश गडकरी यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. मात्र, त्यांचे मराठी वाङ्ममयातील कार्य महान आहे. त्यांचे कार्य साहित्याच्या माध्यमातून पुढे आणले पाहिजे. राम गणेश गडकरी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु दगडा-विटांच्या स्मारका अगोदर त्यांचे शब्दांचे स्मारक उभे करायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.    लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी संपादित केलेल्या 'साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी' या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी  ते बोलत होते. प्राचार्य डॉ. रमणलाल शहा, पत्रकार स्वप्नील पोरे, विश्वास वसेकर ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, शिरीष चिटणीस, शिल्पा चिटणीस यावेळी उपस्थित होते.  हर्डीकर म्हणाले, गडकरींचे मराठीतील साहित्य अत्यंत मोलाचे आहे. गडकरी हेच ख ऱ्या अर्थाने मराठी नाटकाचे मूळ मालक आहेत. गडकरींचे सगळे आयाम ज्याने घेतले, असा दुसरा नाटककार नाही, म्हणूनच मराठीतील शेक्सपियर अशा शब्दात गडक-यांची नोंद घेतली जाते. ’साहित्यातील राजहंस राम गणेश गडकरी’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे असून अशा पुस्तकांमुळे मराठी समीक्षेचा परिप्रेक्ष बदलणार आहे. गोविंदाग्रज केशवसूत आणि बालकवी हे पुण्यामध्ये राहत होते. विसाव्या शतकातील या सर्वच कवी लेखकांवर नव्याने समीक्षा होण्याची आवश्यकता आहे. चिटणीस यांच्याकडे नव्या समीक्षकांची चांगली टीम तयार असून, त्यांनी हे आव्हान स्वीकारून अशी अनेक पुस्तके मराठी समीक्षेत निर्माण करावीत.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस यांनी केले. यावेळी  लेखक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली.      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.

टॅग्स :Puneपुणे