शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकाच्या कामाची गडकरींकडून चौकशी : मेधा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:32 IST

चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरु करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे दौऱ्यात दिले.

ठळक मुद्देराज्य सरकारही मदत करणार केंद्र सरकारकडून या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी मंजूर

राज्य सरकारही मदत करणारपुणे: भूसंपादनाअभावी रखडलेले चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या पुणे दौऱ्यात दिले. महापालिकेकडून भूसंपादनाचे काम निधी अभावी थांबले असून त्यात अडचण असेल तर ती दूर करण्याची सकारात्मकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच दाखवली आहे.आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. त्यांच्याकडून सातत्याने या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकारने या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. गडकरी यांच्या पुणे दौऱ्यात आमदार कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी याबाबत विचारणा केली, त्यावेळी त्यांनी एकूण १४ हेक्टर जागेचे भूसंपादन करायचे असून त्यातील फक्त ५ हेक्टर जागा महापालिकेने ताब्यात घेतली असल्याचे सांगितले. उर्वरित जागेसाठी महापालिकेकडून प्रभावी प्रयत्न होत नाहीत अशी तक्रार आहे.कुलकर्णी म्हणाल्या, महापालिकेकडे जागा मालकांना रोख रकमेत नुकसान भरपाई देण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिका आयुक्त सौरव राव त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आता हे रखडलेले काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आमदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadakriनितिन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस