शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

फ्यूजन आविष्काराची तालयात्रा

By admin | Updated: December 30, 2014 00:10 IST

तबल्याच्या थापेतून साकार होणारी नादब्रह्मतेची अभिजातता.. पाश्चात्त्य तालवाद्यातून व्यक्त होणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ताल.. बासरीचे मंजूळ स्वर... सतारीची झंकार...

पुणे : तबल्याच्या थापेतून साकार होणारी नादब्रह्मतेची अभिजातता.. पाश्चात्त्य तालवाद्यातून व्यक्त होणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ताल.. बासरीचे मंजूळ स्वर... सतारीची झंकार... नृत्यातून दिसलेले पदलालित्य आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या वाणीतून उमटलेले तालाचे पडघम असा ‘तालयात्रे’चा फ्यूजनात्मक प्रवास सोमवारी उलगडला आणि रसिकांना अद्वितीय आनदांची अनुभूती मिळाली. निमित्त होते, बालगंधर्व रंगमंदिर येथे मोहिनीराज संस्थेतर्फे आयोजित ‘तालयात्रा’ या आविष्कारात्मक कार्यक्रमाचे. गायन, वादन आणि नृत्य या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या कार्यक्रमात पं. तळवलकर व शिष्यांनी लय आणि तालांचे सौंदर्य हळुवारपणे रसिकांसमोर खुलविले. मैफलीची सुरुवात भगवान शंकरावरील दृत झपतालातील रचनेने झाली. पाश्चात्त्य तालवाद्यात गुंफलेल्या या पारंपरिक तालाचा नजराणा रसिकांना मोहून गेला. पाश्चात्त्य तालवाद्यांना नेहमीच नाके मुरडली जातात. पण, हीच वाद्ये पारंपरिक तालात लयबद्धतेने आणि शास्त्रीय संगीताला धरून काय आविष्कार घडवू शकतात, ‘याची देही याची डोळा’ प्रचिती संगीतप्रेमींना आली. तीन तालातील नगमा मोहून गेला. दृत त्रितालातील खमाज रागातील पारंपरिक रचना रसिकांची दाद मिळवून गेली. मुखातून अविटपणे उमटणारे तबल्याचे बोल... मधूनच उमटणारा बासरीचा मंजूळ स्वर... ठेक्यावर थिरकणारी पावले.. अंगावर रोमांच उभी करणारी तबल्यावरील थाप.. तबल्याच्या चाटेवरील बोलांची मोहक लयबद्धता.. आणि ड्रमसारख्या माध्यमातून आविष्कारीत होणारे ‘धा धा तिरकिट धा’सारखे बोल यातून तालयात्रा चांगलीच रंगली. कार्यक्रमाचे निवेदन राहुल सोलापूरकर यांनी केले. (प्रतिनिधी)तालयात्रेची संकल्पना १९९४मध्ये प्रथम सादर केली. संगीतामधून राग व्यक्त होतो. त्यातील अभिजातता न सांगता कळते. तालाच्या बाबतीत हे होत नाही. ‘तालयात्रे’च्या माध्यमातून तालातील अभिजातता सांगण्याचा हा प्रयत्न आहे. गायन, वादन, नृत्य हे वेगळे नाही. ते एकच असून, ही त्याची झलक आहे.-पं. सुरेश तळवलकर