शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

फुरसुंगी कचरा डेपोतील कॅमेरे चोरीला; चौकशी न करता नव्या कॅमेऱ्यांसाठी महापालिकेची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:02 PM

फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये काही सीसीटीव्ही खरेदी केलेबसवण्यात आले होते एकूण २२ कॅमेरे, वर्षभरानंतर त्यातील फक्त ८ कॅमेरे शिल्लक

पुणे : किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला असून आधी चोरीची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.उरुळी देवाची फुरसुंगी कचरा डेपो तसेच बाणेर कचरा डेपो येथे बसवण्यासाठी म्हणून महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये काही सीसीटीव्ही खरेदी केले. बाणेर येथील डेपो बारगळल्याने ते कॅमेरेही फुरसुंगी येथे बसवण्यात आले. एकूण २२ कॅमेरे बसवण्यात आले होते. आता वर्षभरानंतर त्यातील फक्त ८ कॅमेरे शिल्लक आहेत. त्यातलेही ३ बंद अवस्थेत आहेत.सजग नागरिक मंचाने माहितीच्या अधिकारात या कॅमेऱ्याने वर्षभरात कचरा चोरीला जात असल्याच्या किती घटना कॅमेऱ्यात पकडण्यात आल्या याची माहिती मागितली. असे एकही प्रकरण घडलेले नाही. प्रत्यक्षात मात्र खासगी कचरा वाहतूकदार फार मोठ्या प्रमाणावर महापालिकेत फसवत असतात. जेवढे टन कचरा आणायला हवा तेवढा आणतच नाहीत, कमी कचरा आणतात, फेऱ्या वाढवातात, आले नसले तरीही फेरी दाखवतात असे अनेक प्रकार होत असतात अशी तक्रारी आहेत.मुळातच शहरामधून जमा करून आणलेला हा कचरा चोरीला जाईल म्हणून तिथे काही लाख रूपये खर्च करून कॅमेरे बसवणे चुकीचे आहे. बसवले तर त्याचा उपयोग व्हायला हवा होता, पण तो झालाच नाही, व कॅमेरेही चोरीला गेले. त्याची चौकशी न करता प्रशासनाने लगेचच कमी असलेल्या कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातही खुल्या बाजारातील याच कॅमेऱ्यांची किंमत व महापालिकेने निविदेत नमूद केलेली किंमत यात बरीच मोठी तफावत आहे असे मंचाचे म्हणणे आहे. ही निविदा प्रक्रिया थांबवावी, चोरीच्या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :fursungi garbage depotफुरसुंगी कचरा डेपोSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका