शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री, प्रवाशाला मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:33 IST

पुणे विमानतळावरुन दिल्लीला प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एअरपाेर्टवर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री केल्याचे समाेर अाले अाहे. याबाबत प्रवाशाने ट्विट करत तक्रार नाेंदवली अाहे.

पुणे : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशाला विमानतळावरील एका फूड स्टाॅलवर बुरशी लागलेला पदार्थ विकल्याचे समाेर अाले अाहे. प्रवाशाने तक्रार केल्यानंतरही याबाबत कुठलिही दखल न घेतल्याने प्रवाशाला नाहक मनस्तापाला समाेरे जावे लागले.  त्यामुळे एकीकडे पुणे विमातळावर प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांना चांगल्या दर्जाचे पदार्थ मिळणार का, असा प्रश्न विचारला जात अाहे.     रुपेश राय यांच्यासाेबत हा प्रकार 25 एप्रिल राेजी घडला. राय हे रात्रीच्या 10.45 च्या फ्लाईटने दिल्लीला चालले हाेते. त्यांनी एअरपाेर्टवरील एका फूटस्टाॅलवरुन व्हेज पफ खाण्यास घेतले. त्यावेळी ते ताजे नसल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्यांनी खाण्यास घेतले असता त्याचा कुजट वास येत हाेता. त्यांनी ते खाेलून पाहिले असता त्याला बुरशी लागली हाेती. त्यांनी याबाबत स्टाॅलवरील कर्मचाऱ्याला सांगितले. कर्मचाऱ्याने ते घेऊन न बघताच कचरापेटीत टाकून दिले, त्यांना त्या पदार्थाचा फाेटाेही काढू दिला नाही. तसेच वातावरणात उष्णता असल्याने ताे व्हेज पफ खराब झाला असेल असे सांगितले. याबाबत त्यांनी एअरपाेर्टवरील अधिकाऱ्यांना सांगितले असता, त्यांनीही या घटनेला फारसे गांभिर्याने घेतले नाही. तसेच त्याच फूड स्टाॅलवरील एका वहीत याबाबत तक्रार करण्यास सांगितले. या सगळ्याचा राय यांना मनस्ताप झाला. त्यांनी दिल्लीला गेल्यानंतर याबाबतचे ट्विट केले. त्यावर तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल असे रिट्विट एअरपाेर्ट अाॅथाेरिटीकडून करण्यात अाले.     यापूर्वीही काही प्रवाशांनी एअरपाेर्टवरील खाद्यपदार्थांबाबत तक्रारी केल्या हाेत्या. त्यामुळे एअरपाेर्टवरील खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. याबाबत बाेलताना पुणे विमानतळाचे संचालक अजय कुमार म्हणाले, अाम्ही प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतली असून संबंधित स्टाॅल चालकाला नाेटीस बजावली अाहे. प्रवाशाकडे या घटनेबाबतचे कुठलेही पुरावे नाहीत. अाम्ही स्टाॅल चालकाकडे चाैकशी करत अाहाेत. गरज पडल्यास प्रवाशाकडून अधिक माहिती घेण्यात येईल.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळPuneपुणेfoodअन्नAirportविमानतळ