शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात; पेरणेच्या स्मशानभूमी परिसरात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:28 IST

मृतदेहाचा अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात करावा लागत आहे.

लोणी कंद : बाभळीच्या झाडाचा वेढा, शेजारी सतत वाहणारा दुर्गंधीयुक्त ओढा, चिखलाचे साम्राज्य , पाणी, वीज, रस्ता, निवारा अशी कशाची सोय नाही, ते ठिकाण म्हणजे पेरणे गावची स्मशानभूमी. परिणामी मृतदेहाचा अंत्यविधीही दुर्गंधीमय वातावरणात करावा लागत आहे.पेरणे (ता. हवेली) गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजारइतकी आहे. पेरणे फाटा नवीन नागरीवस्ती झपाट्याने विकसित होत आहे. गावठाणाच्या उत्तर दिशेला गट नंबर ११९० मध्ये नऊ गुंठे जागेत स्मशानभूमी व दशक्रिया विधी घाट आहे. जागेमधूनच ओढा जात आहे. दहनविधीसाठी एक दफनपिंझरा आहे म्हणून स्मशानभूमी म्हणायचे. बाकी कुठलीही सुविधा नाही. गावाला वळसा घालून शाळेच्या पाठीमागून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खाचखळग्यांतूनच जातो. भुयारी गटाराचे काम अर्धवट, ड्रेनेजवर झाकणे नाहीत अशी परिस्थिती आहे. ड्रेनेजवर केवळ एक कडप्पा टाकला आहे. काही दिवसांपूर्वी त्यात रेश्मा जुजर मुजावर यांची ३ वर्षांची जैनब नावाची मुलगी पडली होती. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून वाचवली. अशी अनेक मुले खेळतात पडतात; पण ग्रामपंचायतीला जाग येत नाही. रस्त्याच्या कडेला बाभळीची झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहे. स्मशानभूमीमध्ये कायम चिखल असतो.झाडेझुडपे वाढलेली, स्वच्छता नाही, पाणी, लाईट नाही. सर्वांत महत्त्वाचे भीमा नदीच्या पाण्याची थोडीफार पातळी वाढली तर हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. एकूण अंत्य्विधी करतानानकोसे वाटावे, अशी दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व सुविधायुक्त स्मशानभूमी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सोमवारी एक दशक्रिया विधी कार्यक्रम झाला. या वेळी श्रद्धांजली वाहताना जिल्ह्यातील एका नेत्याने सडकून टीका केली. समाजासाठी काहीतरी चांगले काम करा. शासकीय निधी मिळत नसेल तर वर्गणी काढा. मी पन्नास हजारांची मदत करतो, या शब्दांत संताप व्यक्त केला. मात्र तरीही ग्रामपंचायतीकडून अजूनही काहीच हालचाल झाली नाही.या ग्रामपंचायत कमिटीचे काय चाललंय कळत नाही. गावाच्या विकासाचा काही आराखडा नाही. पूर्वी जागेचा प्रश्न होता, त्यामुळे काम करता आले नाही; आता स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे, तरी ग्रामपंचायतीने या कामाला प्राधान्य द्यावे.- अण्णासाहेब टुले, माजी सरपंचकाही तांत्रिक अडचणी आहेत; मात्र लवकरच हे काम पूर्ण करू.- रुपेश ठोंबरे, सरपंच, ग्रामपंचायत पेरणे 

टॅग्स :Puneपुणे