याप्रकरणी राज रवींद्र पवार (वय २३, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार हा वेगवेगळ्या प्रकारच्या ३ गंभीर गुन्ह्यामध्ये सुमारे ६ महिन्यांपासून फरार होता. तो कवडीपाट टोलनाक्याजवळ येणार असल्याची माहीती लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध
पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार आनंद पाटोळे, विजय गाले, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांनी कवडीपाट टोलनाका येथे सापळा रचून राज पवार यास मोठया शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. त्याचेवर यापूर्वी ७ गुन्हे दाखल असून तो सराईत असल्याने गेले ६ महिने पोलिसांना चकवा देत होता. ससदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील , सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी केली आहे.