शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘लघु अभ्यासक्रमां’तून एफटीआयआयच्या खासगीकरणाचा घाट?; स्टुडंट असोसिएशनचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:47 IST

एफटीआयआय या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

ठळक मुद्देसंस्थेला मनी मेकिंग करण्याचा धंदा बनविले जात आहे : स्टुडंट असोसिएशनकलेच्या शिक्षणावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असता कामा नये : भूपेंद्र कँथोला

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रशासनाचा ‘लघु अभ्यासक्रमां’च्या माध्यमातून संस्थेचे व्यवसायीकरण करण्याचा घाट घातला जात असून, संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. खासगी क्लास सुरू करून कलेचे शिक्षण सर्वांसाठी खुले करून दिले जात असेल, तर आम्ही प्रवेश परीक्षा देऊन कशाला इथे प्रवेश घेतला? अशा शब्दांत एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने ‘लघु अभ्यासक्रमां’वरच आक्षेप घेतला आहे. मात्र, कलेचे ज्ञान विशिष्ट लोकांपुरते मर्यादित राहता कामा नये. अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची इच्छा असूनही, संस्थेत शिक्षण घेता येऊ न शकणाऱ्या लोकांच्या दारापर्यंत ‘एफटीआयआय’ पोहोचली आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून संचालकांनी असोसिएशनच्या विधानांनाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.एक काळ असा होता, की संस्थेच्या चार भिंतींच्या आड काय सुरू आहे? ही संस्था काही विशिष्ट लोकांसाठीच आहे, अशी एक धारणा सर्वसामान्यांची होती. संस्थेच्या प्रवेश परीक्षेला देशभरातून ५,००० विद्यार्थी बसत असले तरी प्रत्यक्षात ११० विद्यार्थ्यांची निवड केली जात असल्यामुळे कलेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांचे काय? कलेचे शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतेच सीमित न राहता ते सर्वांना दिले गेले पाहिजे, या उद्देशाने संस्थेच्या प्रशासनाने लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनाच संस्थेमध्ये येणे शक्य नाही; म्हणून एफटीआयआयच्या लोकांच्या दारी पोहोचली आहे. देशातील १४ शहरांमध्ये एफटीआयआयने लघु अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असून, आजपर्यंत २,५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अमरावतीमध्येही अभ्यासक्रम सुरू झाला आहे. हा लघु अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून, नेपाळमधील २० कलाकारांचा ग्रुप २० दिवसांच्या लघु अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असल्याचे कँथोला यांनी स्पष्ट केले. पण दुसरीकडे, एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने पैसा कमावण्याच्या उद्देशाने संस्थेकडून लघु अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला आहे. या अभ्यासक्रमांसाठी १० ते २० हजारांपर्यंतचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे संस्थेचे लक्ष्य हटले आहे. या संस्थेला मनी मेकिंग करण्याचा धंदा बनविले जात असल्याची टीका असोसिएशनने केली आहे. 

कलेच्या शिक्षणावर विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असता कामा नये. याकरिता लघु अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हे शिक्षण सर्वसामान्यांनाही उपलब्ध करून दिले आहे. यातून चित्रसाक्षरता वाढीस लागत आहे. - भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

टॅग्स :FTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोलाPuneपुणे