शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआय प्रशासन आंदोलनासमोर झुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:17 IST

स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले.

ठळक मुद्देरद्द लघुपटाचे सादरीकरण : विद्यार्थ्यांनी व्यक्त केला होता संतापअभाविपने धमकी दिल्यामुळे प्रशासनाने या लघुपटाचे प्रदर्शन रदद केल्याचा आरोपअभ्यासक्रमाचा भाग म्हणून होरा लघुपट दिग्दर्शित

पुणे : फिल्म अँंड टेलिव्हिजन आॅफ इंडिया ( एफटीआयआय) मधील स्टुडंट असोसिएशनच्या माजी अध्यक्षाच्या प्रोजेक्ट लघुपटाचे सादरीकरण करण्यास प्रतिबंध घालणा-या प्रशासनाला अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. या लघुपटाच्या सादरीकरणास परवानगी मिळाल्यामुळे प्रशासनाने रदद केलेल्या लघुपटाचे प्रदर्शन सोमवारी सायंकाळी पार पडले.    ह्यकबीर कला मंचाह्णच्या एका कलाकाराचा प्रवास दाखविणा-या होरा या लघुपटाचे सादरीकरण एफटीआयआयने गुरुवारी अचानक सुरक्षेचे कारण देऊन रद्द केले. अभाविपने धमकी दिल्यामुळे प्रशासनाने या लघुपटाचे प्रदर्शन रदद केल्याचा आरोप एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने केला होता. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. लघुपटामध्ये काय आहे हे न पाहाताच त्याला  ह्यमाओवादीह्ण ठरवून हे पाऊल उचलण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे होते. विद्यार्थ्यांनी या मुद्द्यावर आंदोलन केल्याने एफटीआयआयला अखेर परवानगी द्यावी लागली. सोमवारी सायंकाळी संस्थेच्या मुख्य थिएटरमध्ये हा लघुपट दाखविण्यात आला.एफटीआयआयच्या संचालकांशी सतत बोलणी सुरू होती. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांसाठी सादरीकरणाला परवानगी दिली. पण या लघुपटाशी संबंधित व्यक्तींना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांचे ओळखपत्र जमा करा, मग ठरवू असे सांगितले गेल्याने विद्यार्थ्यांनी हे शक्य नसल्याचे कळवले. त्यावर एफटीआयआयने विद्यार्थी आणि विशेष निमंत्रित व्यक्तींसाठी परवानगी दिली. गोंधळाविना हे सादरीकरण पार पडले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.नचिमुथू हा एफटीआयआयह्णमध्ये दिग्दर्शन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून तो संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्याने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून   होरा लघुपट दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला