शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गॅसची लाईन फुटल्याने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:34 IST

महाराष्ट्र नॅचरल गॅस : कामादरम्यान लाईन फुटण्याची दुसऱ्यांदा घटना, दुकाने बंद, वीज खंडित

बिबवेवाडी : येथील स्वामी विवेकानंद मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू असून या मार्गावरील शिवरत्न सोसायटीसमोरील जुन्या रस्त्याची खोदाई करण्याचे काम चालू असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस पाइप लाइनला धक्का लागून पाइपलाइन फुटून मोठा आवाज झाला व त्यातून गॅसगळती सुरू झाली.

संध्याकाळी साधारणत: ६.४५ वाजता अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे या परिसरातील नागरिक व रस्त्यावरील वाहतूकदारयांची धावपळ सुरू झाली व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच कात्रज अग्निशमन केंद्रातून एक आगीचा बंब व आपत्ती व्यवस्थापनाची देवदूत गाडी घटनास्थळी सर्वात आधी दाखल झाली व तांडेल तळेकर व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅसची व्यवस्थापनाची गाडी आली. यावेळी स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांनीही घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईन फुटण्याची घटना संध्याकाळी झाली यावेळी स्वामी विवेकानंद मार्गावर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक सुरू असते. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी व कुणाच्याही मालमत्तेचे काही नुकसान झाले नाही.१ महाराष्ट्र नॅचरल गॅस लाईन फुटली त्यावेळी गॅसचा दबाव एवढा प्रचंड होता, की ज्या जेसीबी मशीनने रस्ता खोदाई करण्याचे काम चालू होते त्या मशीनची काचेवर दगड उडून लागल्यामुळे काच फुटली. त्यामुळे या परिसरातील गाळेधारकांनी आपली दुकाने बंद करून वीजप्रवाह बंद केला होता.२ या मार्गावर रस्ता खोदाई करत असताना गॅस लाईन फुटण्याची ही दुसरी घटना असून, रस्ता खोदाई करत असताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लाइनची व्यवस्थापन करणारी गाडी किंवा त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित असावेत, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. 

टॅग्स :Puneपुणे