शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बारामती येथे हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:34 IST

कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने बारामती येथे कांदा फुकट वाटला.

ठळक मुद्देअनोखे आंदोलन : स्वेच्छेने ग्राहकांनी दिलेले पैसे पाठवणार मोदी आणि फडणविसांनाकांद्यासाठी माझा एकरी ४५ हजार रूपये खर्चपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर अभिनंदन’ असा उपरोधिक मजुकूर

बारामती : कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथे शेतकऱ्याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाऱ्यांनी स्वेच्छेने दान पेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येणार आहेत. असा फलक याठिकाणी लावून या शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध केला आहे. बारामती नगरपालिकेसमोर जैनकवाडी येथील तरूण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयश व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला. दिनेश काळे म्हणाले, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये मी कांद्याची लागवड केली. दीड एकरात १५० बॅग कांदा झाला. त्यापैकी १२० बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ १२ हजार रूपयांमध्ये विक्री केली. कांद्यासाठी माझा एकरी ४५ हजार रूपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ १२ हजार रूपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. स्वेच्छेने काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. शासनाला शेतकऱ्याची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, असे काळे यांनी सांगितले.  काळे यांनी लावलेल्या फलकावर ‘शेतकरी बांधवांना मागील ४ वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावर खुश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर अभिनंदन’ असा उपरोधिक मजुकूर देखील लिहला आहे. तर दिनेश यांच्या सोबत ८ वीत शिकणारा त्यांचा मोठा मुलगा श्रेयश व सहावीत शिकणारा लहान मुलगा प्रसाद देखील शाळेचा दिवस बुडवून वडिलांना मदत करत होते. दरम्यान, कांदा फुकट विक्रीसाठी मांडल्याचे लक्षात आल्यानंतर याठिकाणी या शेतकऱ्याची विचारपुस करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. उत्पादन व उत्पन्न यातील तफावत समजुन घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन गंभीर नसल्याचीही चर्चा याठिकाणी रंगली होती. काही नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन त्यांच्या अनोख्या आंदोलनाना आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच अनेकांना कांदा घेऊन जात दानपेटीमध्ये पैसेही टाकले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीGovernmentसरकार