शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोंढवा पोलीस ठाण्यात रंगला  ‘मैत्री मेळावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:19 IST

आपल्या कृतीतून शांतता, सामाजिक ऐक्य , बांधिलकी जपणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या मंडळे व कार्यकर्त्यांचा मैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देमंडळांचा सत्कार : विधायक उपक्रम राबवित पोलिसांना केले सहकार्य

पुणे : गणेशोत्सव असो की ईद , महापुरुषांच्या जयंत्या असो की सण... पोलिसांची डोकेदुखी ठरलेलीच...कार्यकर्त्यांच्या उत्साहाला वेसण घालताना पोलिसांना नाकी नऊ येतात...मात्र, काही जबाबदार मंडळे आणि कार्यकर्ते पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजात आदर्श प्रस्थापित करतात. अशाच काही मंडळांचा आणि कार्यकर्त्यांचा  ‘मैत्री मेळावा’ कोंढवा पोलीस ठाण्यात पार पडला. यावेळी सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदाम पाचोरकर, सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद, विलास तोगे आदी उपस्थित होते. पोलिसांच्या कामामध्ये नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकच पोलिसांचे डोळे आणि कान आहेत. लोकाभिमुख पोलिसींगसाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनीही हक्कांबाबत जागरुकता ठेवताना जबाबदा-या आणि कर्तव्याची जाणीव जपणेही आवश्यक असल्याचे मत यावेळी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी पुस्तकांची दहिहंडी केल्याबद्दल आदित्य अ‍ॅकेडमी, अखिल शिवनेरीनगर दहिहंडी उत्सव यांचा सत्कार केला. तर, श्रीमंत साईनाथ तरुण मंडळाने पाणी बचतीचा संदेश दिला, शिवप्रेमी हनुमान मंदळाने मिरवणूक न काढता शांतता प्रस्थापित केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर, हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करताना विना स्पिकर मिरवणूक काढलेल्या लबैक यंग सर्कल व शांततेत मिरवणूक काढलेल्या बज्मे इमदाद यंग सर्कल या मंडळांचा सत्कार केला. यासोबतच मोहर्रम मिरवणूक शांततेत पार पाडलेल्या मंडळाचे अध्यक्ष गुलाम हुसैन यांचा सत्कार करण्यात आला.  संत ज्ञानेश्वर मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अवयव दानाचे १३५ अर्ज भरुन घेतले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केल्याबद्द्ल सत्कार करण्यात आला. कोंढबा बुद्रुक एक गाव एक शिवजयंती साजरी करणा-या १७ मंडळांचा सन्मानही करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आरोग्य शिबीराचे आयोजन करणा-या लॉर्ड बुद्ध फाऊंडेशन ट्रस्टचा  तसेच गौतम बुद्ध जयंतीनिमित्त १५ मंडळांनी एकच मिरवणूक काढल्याने अखिल वानवडी-महम्मदवाडी-कृष्णानगर-कोंढवा भगवान बुद्ध व डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव कमिटीचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक गणेश कुल्हाळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केले. ....................

टॅग्स :KondhvaकोंढवाPoliceपोलिसGaneshotsavगणेशोत्सव