शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून मित्रचा केला खून

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पुणो : पूर्ववैमनस्यामधून मित्रचेच अपहरण करून त्याचा डोक्यात दगड घालून खून करणा:या तीन जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. 
नितेश मोहन केसरी (21, सध्या रा. वडगाव बुद्रुक. मुळ रा. झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी प्रशांत रमेश वाघवले (वय 2क्), प्रवीण चंद्रकांत खांबे (2क्) आणि तुषार राजेंद्र जाधव (23, तिघे रा. स.नं. 13क्, दांडेकर पूल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका 16 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. नितेश हा लॉटरीच्या दुकानात काम करीत होता. भाऊ मुकेश आणि राकेश यांच्यासह राहण्यास असलेल्या नितेश 11 सप्टेंबरला बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांनी 14 सप्टेंबरला सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा सिंहगड रस्ता आणि दत्तवाडी पोलीस संयुक्तपणो तपास करीत होते. 
दत्तवाडी पोलिसांना नितेशचा खून झालेला असून त्यामागे प्रवीण आणि तुषार असल्याची माहिती मिळाली होती.  त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत, संदीप देशमाने, उपनिरीक्षक राजपूत, कर्मचारी सचिन ढवळे, सूरज सावंत, प्रमोद कळंबकर, रघुनाथ जाधव, अशोक गवळी, नीलेश खोमणो आणि नीलेश जमदाडे यांनी आरोपींना उचलले. नितेशला गोड बोलून आरोपींनी 11 तारखेला मोटारसायकलवरून भोर येथे नेले. जबर मारहाण करून त्याचा रुमालाने गळा आवळला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. नितेशचा मृतदेह त्यांनी भोरपासून सुमारे 4क् किलोमीटर दूर भोर-महाड रस्त्याजवळ असलेल्या आशिंपी येथे टाकला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपी पुण्याला आले. (प्रतिनिधी)
 
4भोर पोलिसांना आशिंपी-पसुरे रस्त्यावर एक मृतदेह पडला असून, दरुगधी येत असल्याची माहिती मिळाली होती. भोर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले. 
4पूर्णपणो कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. नितेशचा शोध घेत दत्तवाडी पोलीस भावांना घेऊन भोर परिसरात गेल्यावर त्यांना नितेशच्या मृतदेहाची माहिती मिळाली.
4 नितेशच्या कपडय़ांवरून त्याला भावांनी ओळखले. हा मृतदेह नितेशचाच असल्याची पोलिसांची खात्री झाली. अटकेतील आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिली आहे.