शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोस्त दोस्त ना रहा; आलिशान गाडी घेण्यासाठी मित्रानेच केली मित्राची हत्या; आरोपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 01:39 IST

कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलिसांकडून आरोपी चार तासांत जेरबंद

पिंपरी : चाळीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी मित्रानेच युवकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी पहाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे उघडकीस आली. पोलिसांनी मोबाइल फोनवरील ‘कॉल रेकॉर्डिंग’वरून अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

अब्दुलआहाद सय्याब सिद्दीकी (१७) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र उमर नासिर शेख (१९) यास अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलआहाद आणि आरोपी उमर हे दोघे मित्र होते. उमर याने शनिवारी रात्री अब्दुलआहाद यास पार्टीच्या बहाण्याने स्पायसर कॉलेज येथील उद्यानात नेले. तेथे अब्दुलआहाद फोनवर बोलत असताना उमरने त्याच्या डोक्यावर वार करत दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर उमरने मोबाइलवरून अब्दुलआहादच्या कुटुंबाशी संपर्क साधला. ‘अब्दुलआहाद मेरे कब्जे में है, ४० लाख रुपये दो, और उसको लेके जाओ,’ अशी धमकी त्याने दिली. अब्दुलआहादचा मोठा भाऊ रिजवान यांनी पुन्हा फोन केला असता, ४० लाख रुपये देनेके बाद तुम्हारे भाई को सलामत घर पे छोडता हूँ, कल फोन करता हूँ, असे म्हणून उमरने फोन बंद केला. त्यानंतर बराच वेळ त्याने फोन बंदच ठेवल्याने अब्दुलआहादच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. अखेर सिद्दीकी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासाअंती उमर याने खून केल्याची कबुली दिली आहे.आलिशान गाडी घेण्यासाठी...आलिशान गाडी घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यातच एक चित्रपट पाहिला. त्यातील अपहरणाच्या बनावाचे कथानक पाहून अब्दुलआहादच्या घरच्यांकडून खंडणी मागण्याचे ठरविले, त्यातून त्याचा खून केल्याचे उमर याने सांगितले.

टॅग्स :Murderखून