शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयांत आता मोफत उपचार; स्वातंत्र्यदिनी खूशखबर, गरिबांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 08:32 IST

या याेजनेला ससून रुग्णालय, पुणे महापालिकेचे दवाखाने किंवा रुग्णालय अपवाद आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्वच शासकीय रुग्णालयात मंगळवार (दि. १५) पासून सर्वच रुग्णांना सर्वच प्रकारचे उपचार माेफत मिळणार आहेत. पुण्यातील ५४२ उपकेंद्र, १०१ प्राथमिक आराेग्य केंद्र, २० ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालय, १ जिल्हा रुग्णालयात हा लाभ मिळणार आहे. या याेजनेला ससून रुग्णालय, पुणे महापालिकेचे दवाखाने किंवा रुग्णालय अपवाद आहेत.

...ही रुग्णालये अपवाद

हे उपचार आराेग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांनाच लागू आहे. हे माेफत उपचार वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये येथे लागू नाहीत.  

काेणते उपचार? 

- सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची नि:शुल्क नोंदणी, माेफत चाचण्या (उदा. इसीजी, एक्स-रे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी), माेफत बाह्यरुग्ण व आंतररुग्ण उपचार, सर्व शस्त्रक्रिया, प्रसूती आणि औषधेही माेफत मिळणार आहेत. - आंतररुग्ण विभागामध्ये दाखल रुग्णास डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आराेग्य आयुक्तांनी दिला आहे.

आराेग्य विभागाच्या अंतर्गत असलेले सर्वच दवाखाने, रुग्णालयांत सर्वच प्रकारे माेफत उपचार आजपासून देण्यात येणार आहेत. याबाबत सर्व शासकीय दवाखाने, रुग्णालये यांना सूचना देण्यात आल्या आहेत. - डाॅ. राधाकिशन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे.

 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल