शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवक्ता परिषदेमुळे अन्यायग्रस्तांना नि:शुल्क न्याय

By admin | Updated: June 20, 2017 07:12 IST

बेंद्रे म्हणाले की, वकील, माजी सैनिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आधार व संरक्षक होऊ शकतो, या विचारातून पुण्यात न्यायकेंद्र या कल्पनेचा जन्म झाला.

बेंद्रे म्हणाले की, वकील, माजी सैनिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आधार व संरक्षक होऊ शकतो, या विचारातून पुण्यात न्यायकेंद्र या कल्पनेचा जन्म झाला. रोटरी क्लब आणि कर्वे संस्था यांच्या सहकार्याने आम्ही एक कायदा केंद्र सदाशिव पेठेत चालविले. त्या माध्यमातून अडचणीत असलेल्या अनेकांना कायद्याचा सल्ला दिला. बऱ्याच केसेस पती-पत्नी नातेसंबंधांच्या होत्या. बऱ्याच प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो. दोन-तीन केसेस मध्ये तडजोड होऊ शकली नाही. संबंधित पक्षकार न्यायालयात पोहोचले; मात्र ते कायदा केंद्र हा एक मोठा अनुभव होता. न्यायालयात न जाता न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही २००४ पासून अधिवक्ता परिषदेचे काम पुण्यातून सुरूकेले, असे नमूद करून बेंद्रे म्हणाले, वकील, निवृत्त न्यायाधीश, कायद्याचे प्रोफेसर, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, चार्टर्ड अकाऊंटंट अशांचा या परिषदेमध्ये सहभाग असतो. एका केंद्रामध्ये ५ वकील असतात. ज्येष्ठ, मध्यमवयीन आणि शिकाऊ दरमहा किंवा विशिष्ट काळात या केंद्रांमध्ये वकील जमतात. त्यांचे अनुभव कथन करतात. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालांचा उहापोह या केंद्रांमध्ये केला जातो. उत्तर हिंदुस्थानात अ‍ॅडव्होकेट किंवा वकिलांना अधिवक्ता संबोधले जाते. जे वकील या परिषदेत काम करतील ते कामाचा मोबदला घेणार नाहीत, हे या परिषदेचे प्रमुख सूत्र आहे,असे स्पष्ट करून बेंद्रे म्हणाले, सध्या पुण्यात १७ ठिकाणी न्यायकेंद्रे आहेत. १०० वकील आहेत. देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये या अधिवक्ता परिषदेचे कार्य सुरूअसून, ३०० सेवाभावी वकील त्यासाठी काम करीत आहेत. पुणे कँटोन्मेंटमधील न्यायकेंद्र अ‍ॅड. प्रशांत यादव यांच्या आॅफिसमध्ये आहे. पुण्यातीलच नव्हे, देशातील ते पहिले न्यायकेंद्र आहे. अधिवक्ता परिषदेचा मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये ताण- तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते, त्या वेळी संबंधितांनी अधिवक्ता परिषदेचे सहकार्य घेतले, तर त्यांना न्याय मिळवून दिला जातो. तडजोड घडविण्यापेक्षाही अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे हे आमच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या परिषदेच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळाला आहे, असे बेंद्रे यांनी नमूद केले. न्यायालयातील विधिसेवा प्राधिकरणाच्या कामात सरकारीकरण असते. अधिवक्ता परिषदेमध्ये वकील ऐच्छिक आणि मनापासून काम करतात. वानवडीतील आमच्या अधिवक्ता परिषद केंद्रामध्ये आलेला अनुभव सांगतो. एका अपंगाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने त्याच्याकडून १ लाख रुपये घेतले. त्या मध्यस्ताने त्याच्याजवळ शिफारस पत्र दिले होते. अपंगत्वाचे भांडवल करून संबंधित अपंग तहसीलदाराकडे पोहोचला. त्या पत्रामध्ये या अपंगाला तलाठ्याची नोकरी द्यावी, असे लिहिले होते. तहसीलदाराने कपाळावर हात मारत अशा प्रकारे सरकारी नोकरी दिली जात नाही, असे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पुढारी, पोलिसांना भेटून काही उपयोग झाला नाही. त्याचे गाऱ्हाणे ऐकून आम्ही अधिवक्ता परिषदेच्या लेटर हेडवर डीएसपीला पत्र लिहिले. ४८ तासांत फसवणूक करणाऱ्याला अटक करून दीड लाख रुपये संबंधित अपंगाला परत मिळाले, असेही त्यांनी सांगितले.