शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:32 IST

महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा फायदा होणारएका बॅचमध्ये ५० प्रशिक्षणार्थींना शिकविले जाणार

पुणे:  महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील तरुण-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआयसी) यांच्या राष्ट्रीय पातळीवर नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्था नियुक्त करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आवश्यक ती तरतुद करण्याच्या महिला व बालकल्याण समितीच्या प्रस्तावास गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याम समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली.     याबाबत राजश्री नवले यांनी सांगितले की, प्रधानमंत्री रोजगार अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआयसी) याच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्था नियुक्त करण्यात आली आहे. या एजन्सी मार्फत १८ ते ५० वर्षे वयोगटातील सर्वांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. कुंभार उद्योग, पाटी पेन्सील निर्मिती, सरपणापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे, गुलाल, रांगोळी तयार करणे, रत्न, कटाई, रंग, यार्निश डिस्टेंपर तयार करणे, लाख कागद, खस ताट्या, झाडु, आदी सर्वच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये अल्प मुदतीच्या १२ दिवसांसाठी २ हजार रुपये तर ३० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ८ हजार रुपये प्रति प्रशिक्षणार्थी खर्च येणार आहे. एका बॅचमध्ये ५० प्रशिक्षणार्थींना शिकविले जाईल. हे प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना शहरामध्ये व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी खास साहाय्य करण्यात येणार असल्याचे नवले यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा फायदा होणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाwomen and child developmentमहिला आणि बालविकास