शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जादा कामगार दाखवून फसवणूक; सदाशिव पेठेतील घटना, अकौंटंटवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:30 IST

कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्देविष्णुवर्धन शशिकांत वाडी आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखलदोन महिन्यांपासून वाडी कामाला आला नाही़ शेवटी पोलिसांकडे दिली फसवणुकीची फिर्याद

पुणे : लाँड्रीत काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ विष्णुवर्धन शशिकांत वाडी (वय ३२, रा़ आंबेगाव पठार) आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी महेश घाटगे (वय ४५, रा़ सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी सांगितले की, घाटगे यांची केळकररोडवर लाँड्री आहे़ त्यांच्याकडे विष्णुवर्धन वाडी हा अकौंटंट म्हणून गेल्या २ वर्षांपासून काम करीत आहे़ घाटगे यांनी कामगारांचे पगारपत्रक दिले की, वाडी या त्यामध्ये मालकाला न कळत २० हजार रुपयांची वाढ करायचा आणि हे पैसे तीन महिलांच्या बँक खात्यात जमा करीत असे़ डिसेंबर २०१६ पासून सप्टेंबर २०१७ पर्यंत हा प्रकार सुरू होता़ या महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर महिन्याभरानंतर या महिलांशी संगनमत करून तो पैसे काढून घेत असे़ सप्टेंबर २०१७ नंतर ही बाब घाटगे यांच्या लक्षात आली़ त्यांनी वाडी याच्याकडे त्याबाबत चौकशी केली़ पण, त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाही़ गेल्या दोन महिन्यांपासून तो कामाला आला नाही़ शेवटी त्यांनी पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे़ या तीन महिलांच्या बँक खात्याची तपासणी केल्यावर त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे आढळून आले आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱ व्ही़ शेवते करीत आहेत़ 

टॅग्स :sadashiv pethसदाशिव पेठPuneपुणे