शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:58 IST

बड्या कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखवत सुरूवातीला तरूणीला काही पैसे भरावे लागतील,असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसायबर क्राईमची कामगिरी : दिल्लीतून घेतले ताब्यातआरोपींनी खाते क्रमांकात वेगवेगळी कारणे सांगून तरूणीला ५४ हजार ३०० रुपये भरण्याची सूचना

पुणे : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणीला गंडा घालणाऱ्या चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेकडून दिल्लीत अटक करण्यात आली. चोरट्यांकडून१४ मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप, डेबिट कार्ड असा माल जप्त करण्यात आला आहे. पिंटू कुमार यादव (वय २५) आणि सतीश राज यादव (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत हडपसर भागातील एका तरूणीने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या तरुणीने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर यादव यांनी तरूणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. नोकरीविषयक सेवा देणाऱ्या संस्थेतून बोलत असल्याची बतावणी दोघांनी तिच्याकडे केली होती. बड्या कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष त्याने तिला दाखविले आणि सुरूवातीला तरूणीला काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले.त्यानंतर तरूणीला एका बँकेचा खाते क्रमांक पाठविला. खाते क्रमांकात वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी तिला ५४ हजार ३०० रुपये भरण्याची सूचना केली होती. तरूणीने बँक खाते तसेच पेटीएमवर काही रक्कम भरली. दरम्यान, पैसे जमा झाल्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला होता. तांत्रिक तपासात आरोपींनी वापरलेले वेगवेगळे मोबाईल क्रमांक, बँक खात्याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पथक तातडीने दिल्लीत रवाना झाले. यादव यांना दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह, सहाय्यक आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक नितीन म्हस्के, अजित कुऱ्हे , नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, अनुप पंडीत, शीतल वानखेडे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाHadapsarहडपसरPoliceपोलिसArrestअटक