शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीमधे पडलेल्या कोल्ह्यांना वन विभागाकडून जीवदान; रेस्क्यू टीम, ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 11:45 IST

या जोडीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला....

कवठे येमाई (पुणे) : शिरूर तालुक्यातील बेट भागातील निमगाव दुडे येथे शनिवार रात्री विहिरीत पडलेल्या कोल्ह्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचारी, रेस्क्यू टीम व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. या जोडीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

निमगाव दुडे येथील बाळासाहेब दाते यांची सिमेंटच्या रिंगमध्ये बांधकाम केलेली विहिर असून या विहिरीत पाणी आहे. पाण्याच्या शोधात असलेली कोल्ह्याची जोडी शनिवारी रात्री विहिरीत पडली. ही घटना सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी आलेल्यांनाही कोल्ह्यांची जोडी विहिरीत दिसून आली.

ही बाब त्यांनी वनविभागाला कळविली. वनपरीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या सूचनेनुसार वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड व वनमजूर हनुमंत कारकुड यांनी परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना विहिरीच्या कपारीच्या आधाराला पाण्यात असलेली ही जोडी दिसून आली. वन मजूर हनुमंत कारकुड यांनी अरुण रावडे, विजय दंडवते, बाळासाहेब दाते, हसन मुजावर, वैभव पानगे, यांच्या मदतीने विहिरीत उतरून अत्यंत शिताफीने या जोडीला जीवरक्षक स्टिकच्या साह्याने पकडले.

यावेळी या टीमने या जोडीला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या जीवदान दिले. ही कोल्ह्याची जोडी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे पाहून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले, असे वनपाल गणेश पवार यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल वनमजूर हनुमंत कारकुड यांच्या धाडसी कामगिरीबद्दल परिसरातूनविशेष कौतुक होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड