शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या दिवशी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:18 IST

तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. 

ठळक मुद्देजेरबंद बिबट्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर चौथ्या दिवशी बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र अद्यापही या भागात दुसऱ्या बिबट्यांचा वावर असल्याने या भागात आणखी पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी युवा कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. निमोणे (ता. शिरूर) येथील इनाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकांना या बिबट्यांनी दर्शन दिल्याने त्यांची पाचावर धारण बसली होती. या भागातील शेळ्या आणि कुत्री यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे स्थानिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी त्वरित हालचाली करून या भागात ५ मे रोजी विठ्ठल काळे यांच्या शेतात पिंजरा लावला. तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड, नियत क्षेत्र अधिकारी बी. एम. दहातोंडे, वनकर्मचारी संपत पाचुंदकर व नवनाथ गांधिले यांनी जेरबंद बिबट्या ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात करण्यात आली.अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला एकट्याने फिरू नये, हातात काठी व उजेडासाठी टॉर्च असावा, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत, फटाक्यांचा आवाज करावा, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.

 

टॅग्स :Shirurशिरुरleopardबिबट्याforest departmentवनविभाग