शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा चौथा दिवस : बोंबाबोंब करून शासनाचा निषेध , कर्जरूपी राक्षसाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 07:10 IST

कानगाव येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचा निषेध केला. या वेळी कर्जरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पाटस : कानगाव येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत बोंबाबोंब आंदोलन करून शासनाचा निषेध केला. या वेळी कर्जरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.कानगाव (ता. दौैंड) येथील शेतकºयांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू केला असून, राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या मोर्चात महिला, पुरुष आणि शाळकरी मुलं सहभागी झाले होते. गावकºयांनी चूलबंद आंदोलन केल्यामुळे गावात एकही चूल पेटली नाही. जोपर्यंत शासन शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, असा पवित्रा कानगावकरांनी घेतला आहे. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे.आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाचा निषेध केला. या वेळी बोंबाबोंब करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या. या वेळी कर्जरूपी पुतळा ग्रामस्थांनी तयार केला होता. त्यात कर्जाच्या नोटिसा, विद्युत बिले कोंबलेली होती, याचे दहन शेतकºयांनी केले. येथील विठ्ठल मंदिरात शेतकºयांचे साखळी उपोषण सुरू आहे. शासनाला जाग आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, या मतावर आंदोलक ठाम आहे.राजकीय जोडे बाजूला ठेवून कानगावचे शेतकरी राज्यव्यापी आक्रोश आंदोलनात उतरले आहे. रविवारी दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे, भाजपा किसान मोर्चाचे दादा पाटील फराटे, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा अ‍ॅड. कमल सावंत, दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, भाऊसाहेब ढमढेरे, शिवाजी थोरात यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

टॅग्स :Farmerशेतकरी