शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 21:42 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

बारामती -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यात होणाऱ्या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येइल. पुढील वर्षापासून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषण महत्वपूर्ण घोषणा उपमुख्मंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केली.

 बारामती येथील रेेल्वे मैदानावर आयोजित २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कबड्डी, खोखो,व्हाॅलीबाॅल,कुस्ती या  स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करतो. सुरवातीला या स्पर्धां आयोजनासाठी आपण राज्य सरकारच्या वतीने २५ लाख रुपये निधी दिला जात असे. त्यानंतर तो निधी ७५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला.

आता राज्याचा अर्थमंत्री या नात्याने या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढील वर्षीपासून १ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर करतो. खेळ चांगला झाला पाहिजे,खेळाडुंना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत,हा यामागे हेतू आहे. खेळाडुंना सोयीसुविधा उभा करण्याचे काम क्रिडा विभाग आणि राज्य सरकार करीत आहे. नवनिर्वाचित क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रिडा विभागासाठी भरघोस निधी देण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे राज्य सरकाच्या वतीने त्यासाठी सर्वाधिक निधी देण्याची घोषणा देखील यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

  या कबड्डी स्पर्घेत राज्य सरकारच्या वतीने २० लाखांची बक्षीसे आहेत. तर यामध्ये बारामतीकरांच्या वतीने २५ लाखांची भर घालण्यात आली  आहे. विजेत्यांना ४५ लाखांची बक्षीसे देण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. छत्रपती शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श लाभलेली   बारामती वैभवशाली इतिहासाची साक्षीदार आहे.

 शहरात आयोजित क्रिडा स्पर्धंाना बारामतीकर मनापासून प्रतिसाद देतात.तसेच खेेळाडु देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे गाैरवोदगार पवार यांनी काढले.यावेळी क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,कबड्डी,कुस्ती हे ग्रामीण भागात आवडते खेळ आहेत.बारामतीत आयोजित या स्पर्धंत महिला आणि पुरुषांचे एकुण ३२ संघ आणि ६०० पेक्षा अधिक खेळाडु सहभागी झाले आहेत. यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी जिंकण्यासाठी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. राज्य कबड`उी असोसिएशनचे सहकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी प्रास्तविक केले.ज्ञानेश्वर जगताप यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी स्पर्धेसाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे,खासदार सुप्रिया सुळे,खासदार सुनेत्रा पवार ,प्रशांत काटे, प्रशांत सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस`थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या स्पर्धेसाठी येणार होते.मात्र,पंतप्रधान आज मुंबइ दाैर्यावर असल्याने त्यांच्या स्वागातासाठी ‘सीएम’ना प्रोटोकाॅलप्रमाणे थांबावे लागले.आम्ही मंत्री देखील पंतप्रधानांना विनंती करुन त्यांच्या परवानगीने  मुंबइतून या स्पर्धेसाठी बारामतीत पोहचलो.तसेच मुख्यमंत्री दावोस दाैर्यावर जाणार असल्याने बारामतीत रविवारी(दि १९) या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी उपस`थित राहु शकणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.