शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चालते आकाश, सार्थक, गुरू अन् पौर्णिमाची मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:28 IST

स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात हे चार बछडे पर्यटकांचे आकर्षण ठरले असून, ते नऊ महिन्यांचे झाले आहेत.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 

पुणे : वाघ म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात धडकी भरते, परंतु, या सुंदर आणि रूबाबदार प्राण्याला पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. सध्या स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात हे चार बछडे पर्यटकांचे आकर्षण ठरले असून, ते नऊ महिन्यांचे झाले आहेत. त्यांना पाहण्यासाठी पुणेकर चांगली गर्दी करू लागले आहेत. हे चारही बछडे एकमेकांसोबत चांगलीच मस्ती करताना दिसून येतात. स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील रिद्धी वाघिणीने कोजागिरी पौर्णिमेला (२३ ऑक्टोबर २०१८) चार बछड्यांना जन्म दिला होता. यात एक मादी आणि तीन नर असे चार बछडे आहेत. त्यांचे नामकरणही महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत केले होते. या बछड्यांना आकाश, सार्थक, गुरू आणि पौर्णिमा अशी नावे दिली आहेत. हे बछडे आता नऊ महिन्यांचे झाले आहेत. 

लवकरच दिसेल पांढऱ्या वाघाची जोडी  प्राणिसंग्रहालयातील पट्टेरी वाघ (रॉयल बंगाल टायगर) पर्यटकांच्या आवडीचा विषय आहे. बागीराम व रिद्धी या जोडप्यातील वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता.  त्यातील अपंग असलेल्या एकाचा मृत्यू झाला होता. आगामी वर्षात दोन वाघ देऊन त्या बदल्यात पांढºया वाघाची जोडी आणण्याचे नियोजन प्राणिसंग्रहालयाचे आहे.  दिवसातून तीन वेळा खुराक या चारही बछड्यांना दिवसातून तीन वेळा खायला दिले जाते. त्यामध्ये सकाळी दुध आणि दोन किलो खिमा, त्यानंतर दुपारी चिकन, मटन आणि सायंकाळी साडेपाच वाजता खिमा मटन देण्यात येते. त्यामुळे हे बछडे सध्या गुटगुटीत दिसत आहेत. या बछड्यांची काळजी घेण्याचे काम दत्ता भगवान चांदणे हे घेत आहेत. 

सकाळी उठल्यापासून बछड्यांच्या खाण्याकडे लक्ष द्यावे लागते. त्यांना सकाळी ११ ते १.३० दरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी बछडे सोडले जातात. त्यानंतर दुपारच्या जेवणाला परत पिंजºयात ठेवले जाते. परत ३ ते साडेपाच दरम्यान नागरिकांना पाहण्यासाठी ते उपलब्ध असतात. सध्या प्राणिसंग्रहालयात हे वाघच लोकांचे आकर्षण बनले आहेत. सध्या येथे लहान-मोठे एकूण ९ वाघ आहेत. लहान असताना मी त्यांना हातात धरून खेळवले आहे. परंतु, आता ते मोठे झाले आहेत. त्यांना लांबूनच जेवण द्यावे लागते. या चारही बछड्यांना माझी सवय असल्याने ते माझे ऐकत असतात. त्यांच्यासोबत एक प्रकारचा आनंद आणि समाधानही मिळते.- दत्ता भगवान चांदणे, केअरटेकर 

टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयTigerवाघPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका