शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भोर नगर परिषदेत चौरंगी लढत, प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:19 IST

भोर नगरपलिकेच्या निवडणुकीत प्रथमच थेट नगराध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होत असून, भरपावसात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

भोर - नगरपलिकेच्या निवडणुकीत प्रथमच थेट नगराध्यक्षाची निवड होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशी चौरंगी लढत होत असून, भरपावसात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर, प्रभाग ८ मध्ये एक विद्यमान नगरसेवक व दोन माजी नगरसेवक यांच्यात चुरशीची लढत आहे. या तिन्ही उमेदवारांच्या पत्नी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. संपूर्ण शहराचे लक्ष या लढतींकडे लागले आहे.भोर शहरातील क्र. ८ प्रभाग हा सर्वांत मोठा आहे. २ हजार ५४५ मतदार, चार झोपडपट्ट्या या प्रभागात आहेत. ७०० ते ८०० मतदार असून ३ जागा आहेत. यातील ८ क मधून काँग्रेसकडून शेटेवाडी चौपाटी येथील सुमंत (बापू) शेटे हे प्रथमच निवडणूक लढवीत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक गटनेते यशवंत डाळ, भाजपाकडून माजी नगरसेवक सतीश शेटे, तर शिवसेनेकडून माजी नगरसेवक केदार देशपांडे निवडणूक लढवीत आहे. चारही उमेदवार तगडे असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल. विशेष म्हणजे, या तिन्ही उमेदवारांच्या पत्नी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असल्याने दोन्ही पदांसाठी हा प्रभाग महत्त्वाचा आहे. चौरंगी लढतीत सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीचे यशवंत डाळ हे यापूर्वी दोन वेगवेगळ्या प्रभागांतून निवडून आले आहेत. त्यांचा हा तिसरा प्रभाग आहे. या प्रभागातून विजयी झाले, तर त्यांची वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येण्याची हॅट्ट्रिक होईल. या लढतीत विद्यमान नगरसेवक बाजी मारणार की माजी नगरसेवक की सुमंत शेटे यांच्या माध्यमातून काँग्रेस आपला बालेकिल्ला राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.प्रभाग १ मध्ये १,३०० मतदार आहेत. येथून नगराध्यक्ष तानाजी तारू यांच्या पत्नी पद्मिनी तारू, चंद्रकांत मळेकर (काँग्रेस), दत्तात्रय भेलके, गौरी नेवसे (राष्ट्रवादी), दत्तात्रय झाजले (भाजपा), प्रवीण दळवी, सोनाली पवार (शिवसेना) यांच्यात लढत होत असली, तरी खरी लढत काँगे्रस व राष्ट्रवादी यांच्यातच होईल.या प्रभागात विकासकामे कमी प्रमाणात झाल्याने विद्यमान नगरसेवकांवर नागरिकांची नाराजी असल्याचे जाणवते. प्रभाग २ मध्ये १,६०० मतदार असून या प्रभागातून समीर सागळे, आशा रोमण (काँगे्रस) मेघा भेलके, यशवंत झांजले (राष्ट्रवादी), लता अंबडकर व सचिन शिंदे (भाजपा), वैशाली चोरघे व हर्षल पवार (शिवसेना), आशा रोमण, अ‍ॅड. विश्वनाथ रोमण यांच्या पत्नी तर मेधा भेलके या माजी उपसभापती सुनील भेलके यांच्या पत्नी आहे. तर, हर्षल पवार हा २१ वर्षांचा तरुण मतदारांना चांगलीच भुरळ पाडत आहे. चौरंगी लढत होत आहे. या प्रभागात भाजपाला मानणारा मतदार असल्याने निवडणूक चुरशीची होईल.प्रभाग क्र. ३ मध्ये २,०१७ मतदार असून काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष तृप्ती किरवे, सचिन हर्णसकर यांना तर भाजपाने राजेंद्र गुरव, लता शिवतरे, राष्ट्रवादीने प्रशांत जाधव, सुमन शेळके व शिवसेनेने सचिन चुनाडी यांना उतरवले आहे. या प्रभागात काँग्रेसने २ माजी नगराध्यक्षांना मैदानात उतरवले असून राष्ट्रवादीने सर्वसाधारण जागेसाठी चांगले आव्हान निर्माण केले आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये २,३०० मतदार असून काँगे्रसचे अमित सागळे, रूपाली कांबळे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका मनीषा काळे, शंकर भिलारे तर भाजपाचे पंकज खुर्द व शिवसेनेचे युसूफ गुलाब शिकलगर आणि नीलेश निवृत्ती पवार हे अपक्ष उभे आहेत. येथे राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये २,०५० मतदार आाहेत. या प्रभागामधून काँग्रेसने गणेश पवार व अमृता बहिरट यांना, तर राष्ट्रवादीने कल्पना शिंदे व नितीन धारणे आणि भाजपाने संजय खरमरे यांना उमेदवारी दिली. माजी नगरसेविका विजया उल्हाळकर यांना भाजपाने पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे व काँग्रेसचे गणेश पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून माजी नगरसेविका विजया उल्हाळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला. त्यांना भाजपाने पुरस्कृत केले आहे.प्रभाग क्र. ६ मध्ये १,५७२ मतदार असून या प्रभागामधून काँग्रेसने नगरसेवक देविदास गायकवाड व वृषाली घोरपडे यांना, तर राष्ट्रवादीने सुहित जाधव, अनिता अंबिके, भाजपाने विजया डिंबळे तर शिवसेनेकडून किरण पवार व काँग्रेसच्या धनश्री सोनवले यांनी अपक्ष म्हणून अर्ज ठेवल्याने या प्रभागात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. प्रभाग ७ मध्ये १,६४२ मरदार असून काँग्रेसचे सोनम मोहिते व अनिल पवार राष्ट्रवादीने जयश्री तारू व धनंजय शिरवले यांना तर भाजपाने शालिनी सागळे व प्रकाश पवार, शिवसेनेने सुनील तारू यांना उमेदवारी दिली आहे.- भोर शहराची लोकसंख्या सुमारे २० हजार असून १५ हजार २४७ मतदार आहेत. एकूण ८ प्रभागांत १७ उमेदवार आणी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असून थेट जनतेतून निवडून द्यायचे आहे. तर, ९ महिला व नगराध्यक्ष एक अशा १० महिला असल्याने पालिकेत महिलाराज येईल.- भरपावसात घरोघरी जाऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणnewsबातम्या