शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:44 IST

निरगुडसर  व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली.

ठळक मुद्देपशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेरखाने, सुरेश टाव्हरे, डॉ. अतुल साबळे यांनी घटनास्थळाची केली पाहणीभर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण

निरगुडसर : निरगुडसर  व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली़ त्यामुळे बिबट्याने जोरदार थर्स्टी फस्ट केल्याची परिसरात चर्चा रंगली आहे़निरगुडसर-पारगाव रस्त्याच्या नजिक राहणाऱ्या बाबाजी रामचंद्र टाव्हरे यांच्या गायीच्या गोठ्याच्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला व तीन शेळ्या ठार केल्या. त्यानंतर शेजारील योगेश भीमसेन टाव्हरे यांच्या गोठ्यातील एक शेळी ठार केली व चार महिन्यांचे शेळीचे करडू बिबट्या घेऊन पसार झाला़ त्यानंतर मेंगडेवाडी येथील धनंजय रोहिदास मेंगडे यांच्या दहा कोंबड्यांवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने ताव मारला. टाव्हरे कुटुंबीय गोठ्यापासून काही अंतरावर राहत असल्याने त्यांना आवाज आला नाही. सकाळी गायींचे दूध काढण्यासाठी सहा वाजता त्यांनी गोठ्यात प्रवेश केला असता चारही शेळ्या मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना बिबट्याचा हल्ला झाल्याचे लक्षात आले़ आजूबाजूला बिबट्याच्या पायांचे ठसे व भिंतीवरून उडी मारताना बिबट्याने केलेल्या कसरतीत भिंतीवर स्पष्ट ठसे उमटलेले दिसले़ सदर घटनेमुळे बाबाजी टाव्हरे यांचे चाळीस हजार रूपयांचे तर योगेश टाव्हरे यांचे वीस हजार रूपयांचे आणि मेंगडेवाडी येथील धनंजय मेंगडे यांचे तीन हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेरखाने, सुरेश टाव्हरे व डॉ. अतुल साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व शवविच्छेदन केले़ त्यातील दोन शेळ्या गाभण असल्याचे डॉ़ शेरखाने यांनी सांगितले. वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी सबंधित शेतकऱ्यांनी केली आहे़वन विभागाचे वनपाल मंगेश गाडे, वनरक्षक सुजाता पाटील, वनमजुर दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला असून गेल्या महिनाभरापासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. निरगुडसर पारगाव रस्त्यावर प्रवाशांना रात्रीच्या वेळी बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. भर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले असून जवळच भोंडवे वस्तीत लावलेला पिंजरा या परिसरामध्ये हलवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़

टॅग्स :leopardबिबट्याambegaonआंबेगावPuneपुणे