शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेशंट व्हेंटिलेटरवर कसा गेला म्हणत डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:11 IST

तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली होती.

पुणे : तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तुमच्यामुळे पेशंट व्हेंटिलेटरवर गेला, असे म्हणून डॉक्टरांना मारहाण करणार्‍या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

असिफ कादीर शेख (वय ३३, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा), जैद जुनेद घोडके (वय २०, रा. मिठानगर, कोंढवा), अफाक अफताब फराश (वय २२, रा. मिठानगर, कोंढवा) आणि अंजिक्य दत्तात्रय भांगे (वय २८, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना इनामदार हॉस्पिटलमधील कोविड १९ सेंटरच्या जवळ २५ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी डॉ. सुहेल खान (वय ३७, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

डॉ. सुहेल खान यांचे कोंढव्यात सना हॉस्पिटल आहे. त्यांचा एक नेहमीचा ३८ वर्षाचा रुगण आजारी असल्याने १३ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये आला होता. तो गोळ्या घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. पण त्याने तो मानला नाही. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तेव्हा त्याला खूप ताप आला होता. तसेच शुगरही वाढली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दाखल करुन घेतले. नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. २१ मार्च रोजी त्याला इनामदार हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्याने तेथे हलविण्यात आले. रुग्णाची काहीही माहिती मिळत नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, इतकीच माहिती हॉस्पिटलकडून दिली जाते, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना इनामदार हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली. त्यानुसार २५ मार्चला रात्री साडेदहा वाजता डॉक्टर खान नातेवाईकांबरोबर इनामदार हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रुग्णाची भेट घेऊन डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली. त्याची फाईल पाहिली. त्यानुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. खाली येऊन त्यांनी ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्याचवेळी असिफ शेख व त्याचे तीन मित्र तेथे आले. तुमच्यामुळे आमचा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला असे सांगून त्यांनी डॉक्टरांच्या मामाला मारहाण केली. डॉक्टर खान यांनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

वानवडी पोलिसांनी असिफ शेख सह त्याच्या मित्रांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.

टॅग्स :Kondhvaकोंढवाdoctorडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलArrestअटक