शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लौकी परिसरात आढळले बिबटे; ग्रामस्थ दहशतीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 02:32 IST

बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी

मंचर : लौकी (ता. आंबेगाव) येथे राणुबाई मंदिराजवळ असलेली काळपट्टी व घोटीमळा येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे उघड झाले आहे. शेतकरी महेश दिनकर थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांना दोन बिबट्यांनी रात्री सात ते आठच्या सुमारास दोनदा दर्शन दिले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच संदेश थोरात व उपसरपंच गजाबा थोरात यांनी केली आहे.कळंब-राणुबाई मंदिर रस्त्यावरील काळपट्टी या ठिकाणी शेतकरी महेश दिनकर थोरात शेतमजूर यांच्यासह मेथीच्या भाजीवर फवारणी करत असताना अंधारात त्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. मोबाइलची बॅटरी आवाजाच्या दिशेने चालू केली असता त्यांना दीडशे फूट अंतरावर शेताच्या बांधावर चार डोळे चमकल्याचे दिसले व त्या डोळ्यांची हालचाल वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे जाणवले. त्याचक्षणी हे बिबटे असावेत अशी भीती मनामध्ये येऊन शेतमजुरांना शेतामधून रस्त्याच्या दिशेने पळा, असे मोठ्या आवाजात सांगितले.शेतकरी राजेंद्र अर्जुन थोरात व शिक्षक संतोष रामचंद्र थोरात वाहनामधून शाळेतून आपल्या घरी चालले होते. त्यांना थांबवून शेताच्या बांधावर बिबटे आहे का, याची खात्री करण्यासाठी गाडीची लाईट बिबट्यांच्या दिशेने मारली असता मुख्य रस्त्यापासून सुमारे चारशे फुट अंतरावर दोन बिबटे मारामारी करत असल्याचे दिसले. पण माणसांचा आवाज व गाडीचा उजेड यामुळे बिबट्यांनी तेथून उत्तरेकडे असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. त्याचवेळी काही घरगुती कामानिमित्त शिक्षक थोरात हे माघारी कळंबला जाऊन पुन्हा घरी निघाले असता त्यांना रात्री आठच्या सुमारास राणूबाई मंदिरजवळील घोटीमळा येथे पुन्हा तेच दोन बिबटे डांबरी रस्त्यावर बसलेले दिसले. त्यानंतरते बिबटे डांबरी रस्ता सोडून शेतीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याने पूर्वेकडे निघाले. त्या ठिकाणी एक बिबट्या रस्त्यावर व एक बिबट्या मका शेताच्या बांधावर उभा होता. याचवेळी शेतकरी संतोष नंदाराम थोरात व लक्ष्मीबाई थोरात यांनी पण बिबटे असल्याचे पहिले. त्यांनर ते बिबटे मका शेतात दिसेनासे झाले. सरपंच संदेश थोरात, उपसरपंच गाजबा थोरात यांच्यासह ग्रामस्थ यांनी शिक्षक थोरात यांची घरी भेट घेऊन घडलेला भीतीदायक प्रसंग समजावून घेतला. वारंवार होणारे विजेचे भारनियमन यामुळे रात्री शेतकºयांना आपल्या शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते, अशा वेळी बिबट्याने हल्ला केल्यास अनुचित प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही. यावर उपाय म्हणूनवीज महामंडळाने भारनियमनात बदल करावा, अशी मागणी उपसरपंच गजाबा थोरात व शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे