शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जीवसृष्टी अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त : डॉ. विद्याधर बोरकर; पुण्यात ‘विज्ञानगप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:14 IST

जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो, असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविविध शास्त्रज्ञांशी गप्पा मारण्याची संधी या व्याख्यानमालेतून मिळत आहे : विनय र. र.मासे, बेडूक, शिंपले, विविध प्रकारचे खडक यावरून जीवसृष्टी अभ्यासण्यात मदत झाली : बोरकर

पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो, असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात आयोजित विज्ञानगप्पांच्या मालिकेतील पहिल्या पुष्पात डॉ. बोरकर ‘जीवाश्म माझ्याशी काय बोलले’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र परदेशी, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., कार्यवाह नीता शहा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

विनय र. र. म्हणाले, ‘आयसरबरोबर विज्ञानगप्पाचे पहिले सत्र यशस्वी झाल्यानंतर आता फर्ग्युसन महाविद्यालयांसोबत या गप्पा होणार आहेत. विविध शास्त्रज्ञांशी गप्पा मारण्याची संधी या व्याख्यानमालेतून मिळत आहे. मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबवत आहे.’

बोरकर म्हणाले, ‘गेली पाच दशके भारतीय द्वीपकल्पातील विविध पाषाणसमूहांमधे आढळणाऱ्या जीवाश्मांचा अभ्यास करत असताना अनेक स्वारस्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळाल्या. साडेसत्तावीस कोटी वर्षांपूर्वी सागरी प्राण्याच्या मादीने केलेल्या भ्रूणकोष्टाचे अवशेष सापडले. त्यावरून अंड्यांच्या संरक्षणासाठी बिळे करण्याची प्रवृत्ती किती पुरातन आहे, हे दिसून आले. प्राण्यांची त्रिस्तरीय रचना समजली. मासे, बेडूक, शिंपले, विविध प्रकारचे खडक यावरून जीवसृष्टी अभ्यासण्यात मदत झाली. सागरी मासे नदीच्या प्रवाहाच्या विरोधात प्रवास करून सरोवरात कसे येतात, हे अभ्यासात आले. परदेशी व भारतीयांच्या मनात जीवाश्मांविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या आणि आहेत.’

प्रा. रवींद्र परदेशी यांनी स्वागत केले. नीता शहा यांनी सूत्रसंचालन केले. संजय मालती कमलाकर यांनी आभार मानले.