शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 03:40 IST

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे.

कामशेत  - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. सध्या ही तटबंदी अधांतरी असून, मोठ्या पावसात या तटबंदीची दुरवस्था होण्याची भीती दुर्गप्रेमी व दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या मावळ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यातच ही तटबंदी अचानक ढासळली तर तटबंदीच्या आत असलेल्या मोकळ्या जागेत असलेले पर्यटक तसेच किल्ला सर करणारे पर्यटक यांच्या जीवितास मोठी हानी पोहचण्याची भीती आहे.त्रिकोणी आकारामुळे तिकोना असे नाव पडलेला तसेच प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असलेला तिकोना (वितंडगड) किल्ला ऊन वारा पाऊस झेलत आजही पवन मावळात दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याच्या कातळात खोदलेली गडद लेणी आणि माथ्यावरील तळजाई लेणी, खोल्या व पाण्याच्या टाक्या प्राचीनतेची साक्ष देत आहेत. कचेरी, दारूगोळा कोठार, वितंडेश्वर मंदिर, कातळ खोदीव पायºया, लेणी व दरवाजे स्तंभ टाक्या युक्त असलेल्या किल्ले तिकोनास शिवकाळात वितंडगड म्हणून संबोधले जात. हा ऐतिहासिक वारसा सांगणारा किल्ले तिकोनाचे गेल्या काही वर्षांमध्ये बरीच पडझड झाली आहे.तिकोनागडावरील बालेकिल्ल्या वर पाण्याचा जाण्याचा मार्ग, बुरूज अशी सर्व सोई युक्त तटबंदी आहे. गडाच्या डाव्या बाजूची तटबंदी काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस व दुर्लक्षित राहिल्याने तीचे अस्तित्व आता राहिलेले नाही. परंतु उजव्या बाजूचा सुंदर बुरूज, तटबंदी अजूनही शाबूत आहे. ती गडाचे गडपण जपून आहे. मात्र या तटबंदीचा एक ३ ते ५ मीटर अंतराच्या तटबंदीचा खालील काही भाग बºयाच दिवसांपूर्वी ढासळला आहे. त्यामुळे तटबंदी अगदी अधांतरी राहिली असून, कोणत्याही क्षणी ढासळू शकते, अशी भीती दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाºया गडप्रेमींकडून वर्तवली जात आहे. तटबंदीच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या पर्यटकास हे माहीत नसल्याने धोका पोहोचू शकतो.दुर्गप्रेमी : तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नकिल्ले तिकोनावर गेली अनेकवर्षे गड संवर्धनाचे कार्य करणाºया वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व पुणे येथील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. या तटबंदीची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून ते प्रयत्नशीलही आहेत. मात्र या तटबंदीस वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यात कायदेशीर परवानगी व मोठी आर्थिक अडचण येत आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या