शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

गड किल्ल्यांचा अभ्यासक काळाच्या पडद्याआड; दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:27 PM

गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने आज (मंगळवार, दि. १७) सकाळी निधन झाले. अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

ठळक मुद्देगडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरतहजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी त्यांनी तयार केली.

पुणे : गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने आज (मंगळवार, दि. १७) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले आहे. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २ हजार किल्ले पाहिले. त्याबाबत लेखन केले. त्याचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आत्मसात करायचा असेल तर गड किल्ल्यांनाच भेटी दिल्या पाहिजेत, असे ठाम मत मांडे यांचे होते. याच ध्यासापोटी त्यांनी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील २ हजार किल्ले तर पाहिलेच पण देशभरातील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. अशा या ध्येयवेड्या इतिहास अभ्यासकाकडे तब्बल १५ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यासोबत ३ हजार स्लाईड्स, २ लाखांहून अधिक गडकिल्ल्यांचे व भटकंतीचे फोटो, ४५० क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो व तैलचित्रे मांडे यांच्या संग्रही आहेत. विशेष म्हणजे राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यातून केलेल्या तब्बल ६३०० किमीच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी दोनवेळा प्रवास केला. त्याचा अभ्यास व संशोधन करून या मागार्चे छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील पिढीसाठी ते मोलाचे ठरणारे आहे.मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे यांनी छत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्र, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत. पुढच्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरत राहिले. त्यासाठी पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. तब्बल २ हजारांहून अधिक गड किल्ल्यांचा पायी फिरून अभ्यास केलेल्या भाऊंना 'दुर्ग महर्षी' व 'सह्याद्री पूत्र' म्हणूनही उपाधी दिली गेली. इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले नवीन पिढीने प्रत्यक्ष जाऊन पाहिले पाहिजेत यासाठी मांडे आग्रही होते. त्यातूनच त्यांनी हजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी तयार केली होती. शेवटपर्यंत त्यांचा हा ध्यास कायम राहिला.

टॅग्स :FortगडPuneपुणे