शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

माजी रणजी कर्णधार राजू भालेकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 20:16 IST

महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय 66 ) यांचे शनिवारी पुण्यात आजाराने निधन झाले.

पुणे : महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय 66 ) यांचे शनिवारी पुण्यात आजाराने निधन झाले.भालेकर यांच्यावर ६ एप्रिलला दुसरी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रात्री साडेआठ वाजता अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे.

17 फेब्रुवारी 1952 मध्ये पुण्यात जन्मलेल्या भालेकर 1972 -73 ते 1985-86 या काळात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलूत्वाची छाप पाडली. यादरम्यान 74 सामन्यांत त्यांनी 7 शतके आणि 18 अर्धशतकांसह 39.17च्या  सरासरीने 3877 धावा केल्या. यात नाबाद 207 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या. किफायती आॅफ स्पिनर असलेल्या भालेकर यांनी 35 बळीदेखील घेतले. गोलंदाजीत 31 धावांत 4 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय कारकिर्दीत 11 ‘अ’ श्रेणी सामनेदेखील ते खेळले. 1975 ते 1977या काळात त्यांनी रणजी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

भालेकर यांचे खरे नाव राजेंद्र. मात्र राजू याच नावाने ते सर्वत्र ओळखले जायचे. क्रिकेटमधील योगदानामुळे त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर महाराष्ट्राच्या रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पीवायसी हिंदू जिमखान्याचे ते दीर्घ काळ कर्णधार होते. गेली 5 वर्षे पीवायसीचे क्रिकेट सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या नेतृत्वात आणि नंतर मार्गदर्शनाखाली पीवायसीने अनेक स्पर्धा जिंकल्या तसेच अनेक गुणवान खेळाडू पुढे आले.