शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 11:36 IST

प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात  निधन झाले. 

शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यामुळे त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होतील.

प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

शेखावत यांना 1972 मध्ये मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर (1991-1992) होते. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून 1985-1990 या कालावधीसाठी निवडून आले होते. 1995 च्या लढतीत त्यांनी त्यांची अनामत गमावली होती. 

अमरावतीचे प्रथम महापौर डॉ. देवीसिंह शेखावत     - डॉ. देवीसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान होत.     - अमरावती महापालिकेचे प्रथम महापौर १९९२ साली     - अमरावती विधानसभा मतदार संघाचे आमदार १९८५ ते १९९०     - अमरावती येथील विद्याभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष     - अमरावती शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष १९९० ते १९९४     - श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सेलुबाजार येथील महाविद्यालयात डॉ. देवीसिंह शेखावत यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटील