शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 3:49 PM

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला.

पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्‍यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला.‘ऑर्डन मेक्सिकाना डी अ‍ॅग्‍यूइला ऍझटेका’ हा पुरस्कार मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्‍पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला प्रदान करण्‍यात येतो. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीजच्या सभागृहात  पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या  साेहळ्याला मेक्सिकाेच्या राजदूत सेन्यूया मेलबा प्रिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मेक्सिकाे देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्यात येताे. यापूर्वी डॉ. नेल्‍सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन, बिल गेट्स या मान्‍यवरांना या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले आहे. पाटील या देशाच्‍या राष्‍ट्रपती असतांना सन 2007 मध्‍ये मेक्सिकोचे राष्‍ट्राध्‍यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्‍डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्‍यांच्‍या निमंत्रणावरुन पाटील यांनी  2008 मध्‍ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्‍ही देशांदरम्‍यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पाटील म्हणाल्या की, 'मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मेक्सिको सरकारचे आभार मानते. हा पुरस्कार माझा नाही तर माझ्या भारत देशाचा आहे. यावेळी त्यांनी मॅक्सिकोला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी मॅक्सिकोसाठी पहिल्या भारताच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांचा आवर्जून उल्लेख केला. स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिलेल्या पंडित यांची जवाहरलाल नेहरू यांनी मेक्सिकोच्या राजदूतपदी निवड केली आणि तेव्हापासून या दोनही देशांचे ऋणानुबंध जुळले आहेत.यावेळी पाटील यांनी चरखा देत मेक्सिको सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली'.

टॅग्स :Pratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलPresidentराष्ट्राध्यक्षMexicoमेक्सिको