पुणो : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा:या माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (38) हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी न्यायालयात शरण आला. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे याचा जामीन फेटाळून 1क् नोव्हेंबरपर्यत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी तो हजर झाला.
उजव्या पायला प्लॅस्टर व हाताला जखमेचे बॅण्डेड या अवस्थेत स्ट्रेचरवरून त्याला सायंकाळी पावणो सहाच्या सुमारास विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या अवस्थेची चौकशीत त्याने अपघात झाल्याची माहिती दिली. यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामीनाचा अर्ज सादर केला. यावेळी सरकारी वकिल उज्वला पवार यांनी जामीनाला विरोध केला. तसेच त्याच्या पोलिस कोठडीचा पोलिसांचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून शिंदेला 19 नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली व उपचारास त्याची ससून रुग्णालयात पाठविले. खंडाळा येथील न्यायालयात न्यायाधीश म्हणून 4 वर्षे कार्यरत असलेल्या शिंदे याला निलंबित करण्यात आले आहे. पत्नी बाहेरगावी गेली असताना कॅरम खेळण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलीवर त्याने बलात्कार केला. भारती विद्यापीठ पोलिसांकडे 31 जुलै रोजी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)