शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग जगतावर शोककळा! बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:14 IST

बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे

पिंपरी : बजाज उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष, पद्मभूषण, माजी खासदार राहुल बजाज (वय ८३ा) (rahul bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील एका रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांचा कर्करोगाची सुरू असणारा लढा अपयशी ठरला. बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थान आहे. कंपनीच्या आवारातच बजाज परिवार वास्तव्यास आहे. महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता. महिनाभरापासून प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  अल्पपरिचयवाहन उद्योगात आघाडीचा उद्योग समूह म्हणून बजाज समूहाची ओळख आहे. ४० वर्षे बजाज यांनी अध्यक्षपद भूषविले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात  १० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. भारतीय स्वांतत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. त्यांना वडील कमलनयन बजाज उद्योगाचा वारसा मिळाला होता. राहुल बजाज यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए केले.  मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. त्यानंतर अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी 'एमबीए'चं शिक्षण पूर्ण केलं होते.

उमेदीच्या काळात त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीत तीन वर्षे काम केले. १९६५ साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. तसेच १९६८ मध्ये त्यांनी सीइओ पदाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज आॅटोने नेत्रदीपक प्रगती केली.  तसेच ३० वर्षे बजाज आॅटो लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली.

कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला.  ४० वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००५ मध्ये बजाज यांनी राजीव बजाज यांच्याकडे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली ओळख निर्माण केली होती. औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २००१ मध्ये  बजाज यांना पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित केले होते. तसेच  २००६ ते २०१० या कालावधीत बजाज यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले. ३० एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी नॉन एक्झिकेटीव्ह डायरेक्टर आणि चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड