पुणो : भारताची संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे. या देशाची जडणघडण सर्व धर्मीयांच्या बलिदानाने झालेली आहे. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे. अल् कायदाने प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या आधारे धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येणो आवश्यक असल्याचे मत पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केले.
अल् कायदाने प्रसिद्ध केलेल्या वादग्रस्त व्हिडिओनंतर पुणो पोलिसांच्या वतीने पुण्यातील मुस्लिम संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहपोलीस आयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, अब्दुर रहमान, डॉ. शहाजी सोळुंके, परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे, दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक, सहायक आयुक्त प्रसाद हसबनीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम आदी उपस्थित होते.
यासोबतच सिरत कमिटी, नॅशनल पर्सनल लॉ कमिटी, जमैतुल उलेमा, बज्मे इस्लाम, इंडियन मुस्लिम फ्रंट, हजरत बाबाजान दर्गाह ट्रस्ट, अवामी महाज, जमैतुल कुरेश, मुस्लिम ओबीसी संघटना, बाबा फरीद यंग सर्कल, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, नाना पेठ सोशल फ्रंट, क्वार्टर गेट युथ कमिटी, या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज प्रत्येकाला आपल्या पोटाची चिंता आहे. त्यामध्ये तरुणांना धर्माच्या नावावर फितवण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे. त्यामुळे त्यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत. यापुढे मुस्लिम तरुणांशी संवाद वाढवण्याची तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. तरुणांशी संवाद वाढवल्यास चुकत असलेली वाट सावरणो सोपे होईल. सोशल मीडियावर येणारे मेसेज, व्हिडिओ, फोटो हे खरे आहेत की खोटे हे तपासणो गरजेचे आहे. ते कोण टाकतो, कोठे बसून टाकतो याची माहिती नसतानाही आपल्या भावना भडकतात. जर तुमच्या आसपास कुठे तरुणांची हालचाल संशयास्पद वाटली, त्यांच्या वागण्यात बदल वाटला, बरेच दिवस न सांगता गायब झाला तर याची माहिती पोलिसांना द्या. सर्वानी शांतता राखा, यंत्रणांना सहकार्य करा, एकत्र राहा आणि एकता ठेवा, असे आवाहन माथूर यांनी केले.(प्रतिनिधी)
1‘अल् कायदा’ या दहशतवादी संघटनेने भारतात आणि विशेष म्हणजे अमदाबाद, काश्मीर आणि आसाममध्ये षडयंत्र आखून कार्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबत जिहादच्या नावाखाली देशात दहशतवाद पसरवण्याच्या केलेल्या घोषणोचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
2अल् कायदाने आजवर परदेशात इस्लामच्या नावाखाली दहशतवाद पसरवला. सुफी संतांची भूमी असलेल्या भारतामध्ये दहशतवाद पसरविण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. आपण सर्वजण मिळून त्यांच्या या षडयंत्रंना पायबंद घालूया.
3आम्ही तमाम देशप्रेमी नागरिकांना आवाहन करतो, की त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपले शहर आणि आपल्या परिसरात अनोळखी आणि संशयास्पद व्यक्ती दिसली तर तातडीने पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन सर्व मुस्लिम संघटनांनी केले आहे.