शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदारयादी उद्या जाहीर, नागरिकांना हरकती नोंदविता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 02:40 IST

पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या मतदारांसह प्रारूप मतदारयादी शनिवारी (दि. १) जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांना येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यानंतर सुधारणेसह अंतिम मतदारयादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त ...

पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या मतदारांसह प्रारूप मतदारयादी शनिवारी (दि. १) जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांना येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यानंतर सुधारणेसह अंतिम मतदारयादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण, नव्याने निर्माण केलेल्या मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. तसेच अगामी निवडणुकांसाठी मतदान केंद्रस्तरीय मध्यस्ताची (बीएलए) नियुक्ती करण्याचे आवाहनही राजकीय पक्षांना करण्यात आले. त्यासाठीच्या अर्जाचे वाटपही या वेळी झाले.

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील दावे अंतिम हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. या दाव्यांवरील सुनावणी ३० नोव्हेंबरपूर्वी घेण्यात येईल. त्यानंतर सुधारणेसह अंतिम यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून नव्याने प्राप्त झालेल्या ईव्हीएम यंत्रणांची चाचणी राजकीय प्रतिनिधींच्या समोर घेण्यात येईल. यंत्र व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री या वेळी करण्यात येईल. निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य केले आहे. त्यामुळे दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांच्या अडचणींचा विचार करण्यात येणार आहे. त्या अडचणींवर उपाययोजना करण्यात येतील. अधिकाधिक दिव्यांगांनी मतदान करावे, यासाठी दिव्यांगांच्या संस्थांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा दिव्यांग समिती स्थापन करण्यात आली असून, त्याच्या सदस्य सचिवपदी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यात साडेसात हजार मतदानकेंद्र निश्चितजिल्ह्यात या पूर्वी ७ हजार ५३४ मतदान केंद्र होती. त्यात १३२ मतदानकेंद्रांची भर पडली असून, ही संख्या ७ हजार ६६६ झाली आहे. या मतदानकेंद्रांची यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक