शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

साकारतोय ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’; महेंद्र भवरे यांचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 15:27 IST

‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.

ठळक मुद्देमहेंद्र भवरे यांनी प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, तीन वर्षांमध्ये पूर्णत्वाला नेण्याचा त्यांचा मानससाहित्याचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, अभ्यासकांना हा ठेवा उपयुक्त ठरावा हा उद्देश

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : १९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा दशकाचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरु केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते, दलित साहित्य आणि या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. हा इतिहास समाज, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा, यासाठी ‘फुले आंबेडकरी वाङ्मय कोश’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. डॉ. महेंद्र भवरे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, पुढील तीन वर्षांमध्ये तो पूर्णत्वाला नेण्याचा मानस आहे.शाहू-आंबेडकरी साहित्याने समाजामध्ये प्रगल्भता निर्माण करण्याचे काम केले. या साहित्यातून तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण पहायला मिळते. साहित्याचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि अभ्यासकांना हा ठेवा उपयुक्त ठरावा, हे लक्षात घेऊन फुले आंबेडकरी वाङ्मय कोश निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. या कोशात आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील लेखक, त्यांचे साहित्यातील योगदान आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख आणि मुख्य संपादक डॉ. महेंद्र भवरे यांनी दिली.या प्रकल्पासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून यात माजी कुलगुरु आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस, लेखक अर्जुन डांगळे, समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांचा समावेश आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे.हा प्रकल्प तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, डॉ. भवरे यांच्यासह राम दातोंडे, डॉ. शामल गरुड, डॉ. सुनील अवचार, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. शैलेंद्र लांडे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ. अशोक इंगळे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. सतीश वाघमारे, डॉ. सुनील चंदनशिवे आदींचा या प्रकल्पात समावेश आहे.महाराष्ट्रातील फुले आंबडेकरी लेखक, साहित्यिक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते यांनी या प्रकल्पासाठी माहिती पाठवावी, असे आवाहन भवरे यांनी केले आहे. या माहितीमध्ये लेखकाची शैक्षणिक वाटचाल, व्यवसाय, प्रकाशित पुस्तके, पुस्तकाचे प्रकाशन वर्ष, प्राप्त झालेले पुरस्कार, पुस्तकाविषयी परीक्षण आणि समीक्षा आदी माहिती अपेक्षित आहे.

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे