केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे राखीव असलेल्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर वन विभागाच्या कारवाईत ३० झोपड्या जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्या. गुरुवारी (दि. २३) दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.बाहेरगावावरून येणाऱ्या ऊसतोड कामगार व गुºहाळ घरांवर काम करणारे परप्रांतीय कामगारांनी या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करत ते राहात होते. वन विभागाच्या अधिकाºयांनी आदेश काढूनही अतिक्रमण केलेल्या झोपड्या ते कामगार हटवित नव्हते.दौंडचे वन परिक्षेत्र अधिकारी महादेव हजारे, पुणे विभागाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी महेश भावसार तसेच वन विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. सध्या पावसाचे दिवस असून, ऐन पावसाळ्याच्या दिवसांत ऊसतोड व गुºहाळ घरांवर काम करणाºया परप्रांतीय कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पारगावला ३0 झोपड्यांवर वन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:20 IST