पुणे : वीकेंड लॉकडाऊनमध्ये पर्यटनासाठी मुळशी तालुक्यातील मुळशी धरण, टेमघर धरण, ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पिंपरी पॉईंट, अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, सहारा सिटी, लवासा सिटी, गिरीवन येथे बंदी आहे. तरीही पर्यटकांकडून आदेशाचे उल्लंघन होताना दिसत असल्याने वनविभागाने पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
पावसाला सुरुवात झाली की ताम्हिणी घाटामध्ये या पर्यटनासाठी पर्यटकांची पावले वळतात. पण आपत्ती व्यवस्थापन कायद्याने या ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तरीही शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टीच्या दिवशी काही हौशी पर्यटक या ठिकाणी सर्व शासकीय नियमांचे व कोरोना प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करून पर्यटन स्थळे पर्यटनासाठी खुली आहेत असे समजून पर्यटनाला येत आहेत. ही पर्यटनस्थळे वनविभागाच्या हद्दीत येत असून सर्व पर्यटनस्थळांना संरक्षित/राखीव वनांचे सर्व नियम लागू होतात.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी ताम्हिणीचे अंकिता दिलीप तरडे, वनपाल मिरुलाल सोनवणे, संजय अहिरराव, योगिता नायकवाडी, गोकुळ गवळी,अभिनंदन सोनकांबळे, उल्हास मोरे, संगीता कल्याणकर, पांडुरंग भिकने, साईनाथ खटके, संजीव कांबळे यांनी केली.