शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:52 IST

बँकेचा व्यवसाय नेणार ४० हजार कोटींवर

ठळक मुद्देबँकेवर झालेला सायबर हल्ला हा अत्यंत दुर्देवी

पुणे : बँकेवर झालेला सायबर हल्ला हा अत्यंत दुर्देवी होता. त्यामुळे बँकेच्या सायबर सुरक्षेवर भर दिला जाईल. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच, बँकेची उलाढाल पुढील पाच वर्षांत ४० हजार कोटींवर नेण्यासाठी कटीबद्ध असल्याचे कॉसमॉस बँकेच्या सहकार पॅनेलचे उमेदवार तथा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले. सहकार पॅनेलचे उमेदवार तथा माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, अ‍ॅड. श्रीपाद पंचपोर, राजीव साबडे, डॉ. स्मिता जोग, अ‍ॅड. जयंत शालिग्राम उपस्थित होते. गोयल म्हमाले, गेली पंचवीस वर्षे मतदारांनी सहकार पॅनेलला साथ दिली आहे. अशीच साथ ते यावेळी देखील देतील. गेली काही वर्षे बँक काहीशी अडचणीत होती. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यातील रक्कम तोटा म्हणून दाखवावी लागली. या रक्कमेची दोन वर्षांत तरतूद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँक  ऑफ इंडियाने (आरबीआय) दिले होते. त्यामुळे लाभांश देखील देता आला नाही. येत्या आर्थिक वर्षात सदस्यांना लाभांश दिला जाईल. तांत्रिक सुरक्षेत वाढ, लांभांश, गुणवत्तापूर्ण कामाची हमी आणि कर्मचारी प्रशिक्षण या मुद्द्यांवर मतदारांना सामोरे गेलो. ‘सहकार आयुक्त म्हणून काम करताना आरबीआयसह नागरी बँकांचे कामकाज जवळून पाहता आले. या ज्ञानाचा उपयोग बँक आणि समाजाला देखील होईल, असे वाटल्याने संचालकपदाच्या निवडणुकीत उभा राहिले असल्याची प्रतिक्रिया माजी सहकार आयुक्त दळवी यांनी दिली. --बँकेवरील सायबर हल्ला दुर्देवी आहे. बँकेची सुरक्षा सक्षम करण्यावर भर दिला जाईल. भविष्यात अशी घटना घडू नये याची दक्षता घेऊ. पुढील पाच वर्षांत बँकेची उलाढाल २६ हजार कोटींवरुन ४० हजार कोटींवर नेऊ.- कृष्णकुमार गोयल, माजी अध्यक्ष आणि सहकार पॅनेल उमेदवार  

टॅग्स :Puneपुणेbankबँकcyber crimeसायबर क्राइम