शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीवर फिरण्यास मनाई; वानवडी वनविभागाचा निर्णय, नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:47 IST

आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात.

ठळक मुद्देआझादनगरबाजूने टेकडीवर जाण्यासाठी वनविभागाकडून भिंत बांधून करण्यात येणार बंदीवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर पुढील काम केले जाईल : प्रवीण राऊत

वानवडी : येथील आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात. वानवडी व महंमदवाडीच्या हद्दीवर मधोमध असणाऱ्या वनविभागाच्या टेकडीवर आझादनगर व एनआयबीएम बाजूने जाण्यासाठी मार्ग आहेत. परंतु आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर जाण्यासाठी वनविभागाकडून भिंत बांधून बंदी करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांना एनआयबीएमच्या बाजूने जाण्यास परवानगी दिली आहे. आझादनगरच्या नागरिकांना एनआयबीएमच्या बाजूने जाण्यासाठी खूप लांबचा टप्पा पार करून पूर्ण वनक्षेत्राला वेढा घालून जावे लागणार आहे. वनविभागाने या टेकडीवरील निसर्ग अबाधित राहावा म्हणून चारही बाजूने संरक्षक भिंत बांधली आहे. परंतु टेकडीवर जाण्यासाठी आझादनगर व एनआयबीएमच्या बाजूने थोडी जागा सोडण्यात आली होती. एनआयबीएमच्या बाजूने त्या भागात असणाºया नागरिकांच्या सहभागाने ‘आनंदवन’ म्हणून गेटची निर्मिती करून टेकडीवर आनंदवन फुलवले आहे. या खडकाळ माळरानावर निसर्ग सौंदर्य जपून ठेवण्यासाठी विविध संघटना, लोकप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी, सोसायटीमधील नागरिक व निवृत्त अधिकारी काम करत आहेत. त्यांचे हे काम पाहून शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. याबाबत नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे म्हणाले, ‘‘ आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर ये-जा करण्यासाठी दरवाजा व वनविभागामध्ये आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी तसेच वृक्षारोपणासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच वानवडीतील नागरिकांना या टेकडीवरील निसर्ग सौंदर्याचा जास्तीत जास्त उपभोग घ्याता यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू.’’

एनआयबीएमच्या बाजूने आनंदवनाच्या प्रवेशद्वारातून त्या भागातील नागरिक टेकडीवर ये-जा करत आहेत. परंतु वानवडीच्या आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर जाण्यासाठी छोटे प्रवेशद्वार करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर पुढील काम केले जाईल.- प्रवीण राऊत, वनरक्षक, वानवडी

टॅग्स :WanvadiवानवडीPuneपुणे