शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:23 IST

कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 

पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंबांकडे किमान काही साठा असतो. मात्र हातावर पोट असणारे त्याबाबत काहीच करू शकत नाहीत. त्यांचे या काळात बरेच हाल होणार आहेत. ते होऊ नयेत यासाठी त्यांना किमान दरात शिधापत्रिकेवर काही ऊपलब्ध होईल याची व्यवस्था सरकारने करावी. त्यातून त्यांना निदान खाण्यासाठी काहीतरी मिळेल. ही सुविधा तातडीने सुरू केलीत तर असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, छोटे व्यावसायिक व गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येणार नाही आणि ते राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरी थांबू शकतील. त्याचा फायदा साथ थांबण्यासाठी होऊ शकेल असे किर्दत म्हणाले. समाजातील एक मोठा वर्ग या बंदीत होरपळून निघत आहे. घरात काही खायला नसेल तर मोठ्यांसह मुलाबाळांचेही हाल होतात. त्यांना सहजपणे अन्नधान्य ऊपलब्ध झाले तर ते किमान आपला स्वाभिमान टिकवून ठेवू शकतील. त्यामुळे सरकारने त्वरीत यात लक्ष घालावे अशी मागणी किर्दत यांनी केली. पुण्यातच असे काही लाख लोक असून ते सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAam Admi partyआम आदमी पार्टी