शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दु:खितांच्या घरी अन्नदाता गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 19:36 IST

सरकार नसले तरी समाज तुमच्या पाठीशी आहे,असा दिलासा देत या युवा कार्यकर्त्यांनी या कुटुंबांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला. 

ठळक मुद्देयुवा काँग्रेसचा उपक्रम: आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिला दिलासाउपेक्षित,दु:खित समाजघटकांच्या घरी जाऊन सण साजरा

पुणे : घरातील कर्त्या पुरूषाच्या आत्महत्या असो किंवा सीमेवर तैनात असताना आलेले वीरमरण. शेवटी एक गोष्ट यात निश्चितच घडते ती म्हणजे या कुटुंबाचा आधार हरवतो. हे दु:ख कधीही न भरुन येणाºया स्वरुपाचे आहे. अशा कुटुंबांच्या घरी जाऊन तिथे गुढी उभारत काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबांचे सांत्वन केले. सरकार नसले तरी समाज तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देत या युवा कार्यकर्त्यांनी या कुटुंबांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला.     अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील सोंदाळा गावातील शेतकरी सूर्यभान ज्ञानदेव अरगडे (वय,३२),उत्सव धुमाला गावातील शेतकरी दिलीप मदाजी काकडे (वय-४८)  त्याच परिसरातील पांडुरंग रामा कदम व अन्य काही शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या तीनही शेतकऱ्यांच्या  घरी जाऊन पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत सांत्वन केले.त्यांच्या घरी गुढी ऊभारण्यात आली. शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी रांगोळी काढण्यात आली. या सर्व कुटुंबांना आर्थिक मदतही देण्यात आली.काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी ते कार्यकर्त्यांसमवेत उपेक्षित,दु:खित समाजघटकांच्या घरी जाऊन सण साजरा करतात. या उपक्रमाचा भाग म्हणून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद अशोक कामठे,सातारा येथील कर्नल शहीद संतोष महाडिक, पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून आलेले शिपाई चंदू चव्हाण यांच्या धुळे येथील निवासस्थानी देखील गुढी उभारण्यात आली होती. संतोष पवार, योगेश निकाळजे,धनंजय कांबळे, संतोष गेळे, गोरख मरळ, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल,अ‍ॅड.चंद्रशेखर पिंगळे, विक्रांत गायकवाड, आदी पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.   

टॅग्स :PuneपुणेGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८