शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे जगणं झालं कठीण! अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत....तृतीय पथीयांची समाजाला हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:49 IST

समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या तृतीय पंथी बांधवांनी दिली.

ठळक मुद्दे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजना

अन्न-धान्य व जवळील पैसे संपलेत, आमच्यासाठीही काहीतरी कोरोना - तृतीय पंथी यांची समाजाला हाकवाकड : कोरोणाच्या प्रादुभार्वामुळे सगळेच त्रस्त आहेत. सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे बाजारपेठा, दुकाने बंद आहेत, रस्ते ओस पडले आहेत. त्यामुळे या सवार्चा मोठा फटका हातावर पोट असलेल्या व समाजात नेहमीच दुर्लक्षित व उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना बसत आहे. मागून आणलेले अन्न-धान्य व पैसे संपल्याने मोठी आभाळ सुरू आहे. आता समाज बांधवांनो आमच्यासाठीही काही तरी कोरोना अशी आर्त हाक या बांधवांनी दिली आहे.

        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी अनेक समाजसेवक, राजकारणी,  महापालिका प्रशासन, सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. काहीजण मास्क वाटत आहेत तर काहीजण औषध फवारणीत गुंग आहेत. मात्र, आमच्या सारख्या तृतीयपंथी समाजाकडे या सर्वांनी मात्र सपशेल पाठ फिरवली आहे. ना आम्हाला कोणी मास्क वाटले, ना कोणी येऊन फवारणी केली हे सगळं जाऊ द्या. आता मात्र आमच्या टीचभर पोटाची ईतभर खळगी भरणं मुश्किल झाल्याने आम्ही सर्वजण तुमच्याकडे आशेने पाहतो आहोत, अशी आर्त साद घातली आहे.

तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या व निर्भया आनंदीजीवन संस्थेच्या अध्यक्षा चांदणी गोरे यांनी समाज माध्यमाद्वारे समाजापुढे तृतीयपंथीयांची ही व्यथा, हे वास्तव मांडले आहे.आम्हीही समाजाचा एक घटक आहोत, आपलेच बांधव आहोत म्हणून मी आपल्याला आवाहन करते की ज्याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील गोर गरिबांना काही समाजसेवी संस्था, देवस्थान कडून अन्नधान्याची मदत केली जाते.  आठवडाभर पुरेल एवढ्या अन्न-धान्याचा पुरवठा मदत म्हणून दिली जाते त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घराजवळच्या तृतीयपंथी बांधवांना दहा दिवस पुरेल एवढं अन्न-धान्य तेल, मीठ, साखर, मसाले अशा जीवनावश्यक वस्तू देऊन आमच्या पोटाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती गोरे यांनी केली आहे.

-----------------------------------------------समाजाने लक्ष देण्याची गरज

पैसे मागणे, यात्रा, उत्सवामध्ये तसेच ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करणे यातून ज्या समाजाच्या आधारे आम्ही या समाजातच स्वत:चा उदरनिवार्हाचा मार्ग शोधला आहे मात्र आता आम्ही पूर्णपणे हतबल झालो असून आपल्या मदतीच्या आधारे या संकटांला सामोरे जाऊ अशी अपेक्षा असल्याने समाजाने आमच्याकडे लक्ष द्यावे. निकिता मुख्यदल (वाल्हेकर वाडी, चिंचवड)-

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTransgenderट्रान्सजेंडरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस